लेखकाच्या मनोगतात डॉ. इस्माईल पठाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वसामान्य अशा सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेवून स्वराज्याची निर्मिती केली. त्यांनी जातीच्या आधारावर नाही तर कर्तबगारीच्या जोरावर अनेक सामान्य लोकांना महत्त्वाची पदे दिली. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची त्यांची भूमिका राहिली.
डॉ. इस्माईल पठाण काय म्हणाले….
- शिवाजी महाराज हिंदू धर्माकडे पुरोगामी, तर मुस्लिम धर्माकडे मानवावादी दृष्टिकोनातून पाहात होते. ख्रिश्चन, पोर्तुगीजांकडे ते त्रयस्त दृष्टिने पाहात होते. प्रथम ते त्यांच्याकडे मित्र म्हणून पाहात होते. पण बारदेस येथे त्यांचे धर्माच्यानावाने सुरू असलेले अत्याचार थांबविण्यासाठी महाराजांनी थेट तलवारीलाच हात घातला.
- पराक्रम अन् निष्ठा या दोन तत्त्वांच्या आधारेच शिवाजी महाराज यांनी ७०० मुस्लिम पठाणांना सैन्यामध्ये सामिल करून घेतले.
- हातात शस्त्र धरायची परवानगी नसणाऱ्या भूमिपूत्रांना शिवाजी महाराज यांनी आपलेसे करून स्वराज्य उभारणीत सामिल करून घेतले. भंडारी, रामोशी, महार, मांग, बेरड अशा समाजातील लोकांचे गुण पारखून त्यांना योग्य ते प्रशिक्षण देऊन सैन्यात सामिल करून घेतले.
डॉ. इस्माईल पठाण काय म्हणाले….
- शिवाजी महाराज यांचा मुस्लिमधर्माकडे पाहाण्याचा उद्दात्त दृष्टिकोन.
- देशमुखापासून महारांपर्यंत सर्वांशी शिवाजी महाराजांनी संवाद साधलेला आहे. स्वराज्याची संकल्पनेचा तो संवाद आहे.
- ज्ञान आणि भान ठेवूनच लोककल्याणकारी राजवट उभी राहाते.
- शिवाजी महाराज यांचे वागणे नितीच्या आधारावर होते त्यामुळे त्यांना भ्रष्टाचारी, अत्याचारी, अन्यायी, स्त्रीयांचा अवमान करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध प्रमाणीची घृणा होती.
- मराठ्यांचे राज्य हे नीतीमत्त्वर आधारित होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.