December 7, 2022
Aamhi Sarech shyajiraj Poem by Vilas Kulkarni
Home » आम्ही सारेच सह्याजी राव…
कविता

आम्ही सारेच सह्याजी राव…

आम्ही सारेच सह्याजी राव

ठोकून देतो मोठ्या झोकात
असता लेखणी आमच्या हातात
स्वाक्षरीत शोधून दाखवा नाव
आम्ही सारेच सह्याजी राव

प्रहर दिवस घटिका मोजीत
बसतो कागद पत्रे खरडीत
राखण करतो फायलींचे गाव
आम्ही सारेच सह्याजी राव

नको व्याप अन वाढता ताप
शोधण्या उत्तर लागते धाप
प्रश्नच मुळात नसतो ठाव
आम्ही सारेच सह्याजी राव

साहेबाची पुंगी डोलतो नाग
येते जी हुजुरी मग मागोमाग
सरडा कुंपण तेवढीच धाव
आम्ही सारेच सह्याजी राव

डोळी झापड कुंभकर्णाचे बाप
सगळेच कसे हो कासव छाप
बदलले दिवस आता तरी धाव
आम्ही सारेच सह्याजी राव

कवी – विलास कुलकर्णी
मीरा रोड

Related posts

पुनवची रात…..

नाते

हिरवं पाखरू

Leave a Comment