खानदेश साहित्य संघ महाराष्ट्रतर्फे सहाव्या अखिल भारतीय आहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन धुळे येथे करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ आहिराणी साहित्यिक रमेश बोरसे तर स्वागताध्यक्षपदी अश्विनी पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दरम्यान, २१ व २२ जानेवारीला होणाऱ्या या साहित्य संमेलनात आहिराणी साहित्यिकांची मांदियाळी जमणार आहे.
आहिरानी मायनी जतरा... राम राम मंडयी फाया गोया करी करेल सनसरादनी/ कारयक्रमनी चवज न्यारी ती गोटज भारी जानेवारीनी २१/२२ तारीखले धुयाले हिरे भवनम्हा सहावं अ.भा.आहिरानी साहित्य संमेलन व्हवाव से. संमेलनले आमदार कुणाल बाबा पाटील तसज स्वागताध्यक्षा सौ.अश्विनी ताई पाटील यास्न भरीव योगदान राहाव से. मातर यंदाना संमेलनम्हा आपुनले नवा पायंडा पाडना से. लोकसहभाग यासाठे आपुनले ल्हेवाना से काही वाटा आहिरानी भासिक लोकेस्नी उचलो आसा इचार आयोजकस्ना से. तरी समधा ताई दादास्ले मी आवाहन करस तुमले जसी सक्य व्हयी तसी जवढी व्हयी तवढी मदत राजीखुसीम्हा करा/स्व इच्छाम्हा करा. फाया जमाडी करेल गावनी जतरा -हावो नही तं नामसप्त्या तठली रमूस आगयी येगयीज -हास तसीज हायी आहिरानी मायनी जतरा से. कोनलेज तसी सक्ती नही मातर आपली मायबोलीनी हायी चयवयम्हा तुमनाभी खारीना वाटा राहू द्दा हायी अपक्सा से. जय आहिरानी जय खान्देस ( संमेलनले आहिरानी रसिकेस्नी लेखक कवीस्नी हजर राही सोभा वाढावो हायीज इनंती ) तुमना मैतर रमेश आप्पा बोरसे
धुळ्यातील हिरे भवन येथे दोन दिवस हे संमेलन होणार आहे. त्या अनुषंगाने आहिराणी साहित्य संमेलनाच्या धुळे येथील संपर्क कार्यालयात सोमवारी (ता. २६) बैठक पार पडली.
बैठकीत खानदेश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी माहिती देताना सांगितले, की आहिराणी साहित्यिक रमेश बोरसे हे निवृत्त माध्यमिक शिक्षक असून, स्तंभलेखनाच्या माध्यमातून साहित्य लेखनाला सुरवात केली. काव्य, कथा, ललित अशा विविध साहित्य प्रकारातून त्यांनी अविरातपणे लिखाण केले आहे. आहिरणी साहित्याला वाहिलेले पहिले आहिराणी खानदेशनी वानगी हे त्रैमासिकही ते नियमितपणे चालवित असतात. आहिराणी भाषेचा प्रचार, प्रसार आणि जोपासनेसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. एकूण कारकिर्दीचा विचार करून रमेश बोरसे यांचा आहिराणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड केली आहे.
दरम्यान, संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अश्विनी कुणाल पाटील यांच्याही नावाची घोषणा करण्यात आली आहे. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्यात्या पत्नी आहेत. खानदेश आणि आहिराणी भाषेला न्याय मिळवून देण्यासाठी माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार कुणाल पाटील यांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत. नाशिक आणि धुळे येथे झालेल्या आहिराणी साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनात आमदार कुणाल पाटील यांचा मोलाचा सहभाग होता.
अहिराणी भाषेमध्ये असणारे निमंत्रण... कविताना वट्टा सभाग नोंदनी करा..... ═════🦋🦋═════ खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य धुय्ये आयोजित ६ वं अखिल भारतीय आहिरानी साहित्य संमेलन धुय्याले २१-२२ जानेवारी, सनवार-आयतार या दोन रोज व्हनार से.... या संमेलनम्हा कविताना वट्टानं आयोजन करेल से. या कविताना वट्टाव्हर कविता सादर करासाठे आपला नावनी नोंदनी करानी से. आपली नोंदनी करासाठे कविता ahiranisahityasamelan06@gmail.com या मेलवर धाडानी से. जेस्ले मेलवर धाडाले आडचीन व्हयी तेस्नी 9403589970 याच व्हाट्सएप नंबरवर धाडानी से. कविता धाडानी शेवटणी मुदत १० जानेवारी ऱ्हाई, मुदत जायेल वर येल कवितास्ना ईचार व्हवावं नई. कविता धाडासाठे आनी सादर कराले काही नियम सेत त्यापरमाने कविता सादर करानी से... १) कविता आहिरानी / खान्देशी बोलीभाषाम्हानज जोयझे. २) कविताना आशय इशय वादग्रस्त नको. ३) कविता जास्तम्हा जास्त ३ मिनिटम्हा सादर करानी. ४) कविता सोतानीच लिखेल जोयझे. दुसरानी कविता किंवा लोकवाड.मयन्या ओव्या म्हनता येवाव न्हयीत. ५) कविता सादर करताना प्रस्तावना करानी न्हयी, आपलं नाव सांगीस्नी कविता सादर करानी. ६) नावनोंदनी करेल व्हयी तेसलेज कविता सादर करता येई. ७) नावनोंदनी आनी कविता मुदतना पह्यले धाडानी से... ८) तांत्रिक गोष्टीस्ना इचार करा ते शेवटला निर्नय संयोजन समितीना ऱ्हायी... संपर्क करासाठे खाले देल नंबरवर बोलता येई.... -------------------------------- कविता वट्टा आयोजन समिती मुख्य समन्वयक -------------------------------- डॉ. कुणाल मुरलीधर पवार, जिल्हाध्यक्ष:- खान्देश साहित्य संघ, जयगांव. मोबा नं- 9403589970 कवी श्री. संजय धनगव्हाळ, धुय्ये मोबा नं- 9422892618 सहसमन्वयक जयगाव जिल्हा खान्देश साहित्य संघ ═════🦋🦋═════
दरम्यान, अहिराणी संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी महिलेला संधी दिल्याने आयोजकांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आमदार कुणाल पाटील यांच्यासोबत अश्विनी पाटील यांचे राजकारण आणि समाजकारणात सक्रिय सहभाग असतो. बचत गट, आशा वर्कर, आंगणवाडी सेविका, अशा क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. अश्विनी पाटील यांच्या स्वागताध्यक्षपदी नियुक्तीचे स्वागत केले जात आहे.
आहिराणी साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला प्राचार्या रत्ना पाटील, शाहिर श्रावण वाणी, नूतन अध्यक्ष रमेश बोरसे, प्रा. रमेश राठोड, रंजन खरोटे, प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी, प्रभाकर सूर्यवंशी, विश्राम बिरारी, रवींद्र पानपाटील, चुडामण पाटील, प्रवीण पवार, आकाश महाले, अॅड. कविता पवार, नाजनीन शेख, कमलेश शिंदे, डॉ. रमेश जैन, एस. जे. बोरसे, श्रीकृष्ण बेडसे, के. एन. साळुंखे, अशोक महाले, अॅड. सागर तापकिरे, प्रा. अशोक शिंदे आदी साहित्यिक उपस्थित होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.