राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचा समारोप
घाटकुळ जि. चंद्रपूर – राष्ट्रसंत साहित्य विचार परिषदेच्या १८ व्या राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचा समारोप आदर्श गाव घाटकुळ (ता. पोंभुर्णा जि. चंद्रपूर ) येथे झाला. श्रीगुरुदेव सेवा मंडळ आणि संपुर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नामदेव कोकोडे होते. समारोपीय अतिथी आदर्श राजगडचे चंदू पाटील मारकवार , समाज कल्याण विभाग उपायुक्त विजय वाकुलकर , ज्येष्ठ साहित्यिक लखनसिंह कटरे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, कवी श्रीकांत धोटे , भाऊराव पत्रे, एड. राजेंद्र जेनेकर, स्वागताध्यक्ष विनोद देशमुख , अरूण झगडकर, ॲड.किरण पाल उपस्थित होते.
याप्रसंगी चंदू पाटील मारकवार म्हणाले, गाव हेचि मंदिर आणि गावातील जन सर्वेक्षर या विचाराने आता पुढे जावे लागेल. केवळ भाषणाने समाजात बदल होऊ शकत नाही तर राष्ट्रसंतांनी सांगितलेल्या विचारांवर कृती केल्यास बदल होईल. त्याकरता स्वतःमधला अहंकार दूर करून गावासाठी झटले पाहिजे. त्यामुळे विचारांची शुद्धी होते आणि आत्मबळ वाढते असे मत त्यांनी व्यक्त केले.
संमेलनाध्यक्ष डॉ. कोकोडे याप्रसंगी म्हणाले, आता परिस्थितीत बदल होत आहे .शहरी राहणारे लोक आता विकसित खेडे पाहायला येत आहे. त्यामुळे ग्रामगीतेतील अध्यात्म आणि विज्ञान या विचाराने समर्पण भावनेने काम केल्यास समाजामध्ये समरसता निर्माण होईल, विश्वसेवेचे काम होईल. राष्ट्रसंतांच्या प्रेरणेने पूज्य तुकाराम दादांनी ज्ञानाची धरोवर असलेली अड्याळ टेकडी निर्माण केली. त्यामुळे अनेक कार्यकर्ते घडले असे ते म्हणाले.
विजय वाकुलकर यांनी संमेलन समितीचे कौतुक करून अशी संमेलने गावोगावी झाली पाहिजे, असा विचार मांडला.
दोन ठराव सर्वानुमते मंजूर
दोन दिवस चाललेल्या या संमेलनात झालेल्या चर्चेनंतर सर्वानुमते दोन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
१. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सरकारने प्रदान करण्यात यावा.
२. गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रसंत अध्यासनाला शासनाने मान्यता देऊन राष्ट्रसंतांच्या साहित्याचा समावेश विद्यापीठाच्या पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमात करण्यात यावा.
३.जिल्हातील प्रत्येक गावी सामुदायिक प्रार्थना व सांस्कृतिक भवन शासनाने निर्माण करणे
संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी आलेल्या प्रतिनिधींनी सकाळी श्रमदान, स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. त्यानंतर सामुदायिक ध्यानावर खेमदेव कन्नमवार यांनी चिंतन प्रस्तुत केले. योग प्राणायामवर विनायक साळवे यांनी मार्गदर्शन केले. सकाळचे अनुभव कथन परिसंवाद सेवकदास खुणे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. प्राचार्य रत्नमाला भोयर यांच्या अध्यक्षतेत धनंजय साळवे आणि विनायक धानोरकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
संमेलनाचे आयोजन मराठा युवक मंडळ व जनहिताय युवक मंडळ तसेच सर्व स्थानिक मंडळाच्या वतीने करण्यात आले. समारोप कार्यक्रमात विशिष्ट सेवा पुरस्काराचे वितरण करण्यात आले.संमेलनाचे आयोजन ग्रामस्थांना नवी उर्जा देऊन गेले असे मत स्वागताध्यक्ष सुप्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते विनोदभाऊ देशमुख यांनी व्यक्त केले. संमेलनाचे आयोजनासाठी पोलिस पाटील अशोक पाल, उपसरपंच शितल विनोद पाल , विठ्ठल धदंरे, प्रकाश राऊत, जयपाल दुधे, रजनी हासे, रंजना राळेगावकर , कल्पना शिंदे, लता खोबरे, रत्नाकर चौधरी, नामदेव पिजदूरकर, राम चौधरी, मुकुंद हासे, अरुण मेदाडे, काजल राळेगावकर, किशोर ठाकरे, ज्ञानेश्वर चौधरी, स्वप्निल बुटले संपुर्ण ग्राम पंचायत सदस्यांनी उत्तम नियोजन केले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.