July 27, 2024
Butea Monosperma Palas Medicinal Plant
Home » पळस (ओळख औषधी वनस्पतीची)
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पळस (ओळख औषधी वनस्पतीची)

ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये पळस या वनस्पतीबद्दल माहिती…

– सतिश कानवडे

संस्थापक,
औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,
सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर
मोबाईल 9850139011, 9834884804

वनस्पतीचे नाव- पळस

वनस्पतीचे वर्णन

फाबेसी या कुळातील वृक्ष. हा प्रामुख्याने ओसाड जमीन, माळरान किंवा कुठल्याही प्रकारचे पिक येणार नाही अशा ठिकाणी येते. ८ ते १० मीटर उंच वाढतो. हा छोटा वाकडा तिकडा वाढणारा पानझडी वृक्ष आहे.

औषधी उपयोगी

पळसाच्या पाना-फुलांत ग्लुकोसाइडस आढळतात. फुलांमध्ये ट्युत्रिन द्रव्ये आढळतात. सालीत किनो टेनीन  व गेलिक अएसीद असते. पळस व आवळ्याचा रस वाळवून सेवन केल्यास बुद्धीची वाढ होते. पळस एक औषधी वनस्पती आहे. विविध रोगावर त्याचा उपयोग होतो. तिच्या पानापासून पत्रावळी बनवतात. मुळापासून धागे बनवतात. फुलांपासून रंग बवतात. बियांपासून औषधी तेल बनवतात. तो एक पवित्र वृक्ष मानतात. फुलांचा काढा लघवी साफ होण्यासाठी करतात.

हवामान व जमीन

पाण्याचा निचरा होणाऱ्या आणि कोरड्या हवामानात चांगली वाढ होते.

लागवड

बियांपासून रोपे तयार करावी. लागवडीसाठी ३ बाय ३ मीटर अंतरावर ३० बाय ३० बाय ३० सेंटीमीटर खड्डा खोदून त्यामध्ये ३० ते ५० सेंटीमीटर वाढ झालेल्या रोपांची लागवड करावी.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

नारायण खराडे आतल्या जाणिवेचा रंगकर्मी

Video : महिला दिनानिमित्त वाळूशिल्प

मसापच्या दामाजीनगर शाखेचे पुरस्कार जाहीर

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading