April 24, 2024
Call for Proposals for Quarterly Varul State Level Literary Awards 2023
Home » त्रैमासिक वारुळ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२३ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

त्रैमासिक वारुळ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२३ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

कोल्हापूरः साहित्य व समीक्षेच्या प्रवाहाला वाहिलेले वारूळ हे मराठी त्रैमासिक मागील पंधरा वर्षापासून नियमितपणे सुरू आहे. या वर्षी वारूळ त्रैमासिकच्या वतीने त्रैमासिक वारूळ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२३ चे आयोजन करण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ सतेज दणाणे यांनी दिली आहे.

या वर्षीच्या पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ या दोन वर्षांच्या कालावधीत प्रकाशित झालेले मराठी भाषेतील कथासंग्रह, काव्यसंग्रह, कादंबरी, समीक्षा किंवा संपादन, नाटक आणि आत्मकथन या प्रकारातील साहित्य मागविण्यात आले आहेत. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून इच्छुक साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीच्या २प्रती,अल्पपरिचय आणि पासपोर्ट फोटोसह प्रस्ताव केवळ पोस्टानेच (कुरीयरने पाठवू नये) ३० एप्रिल २०२४ पर्यंत पाठवावे असे आवाहन वारूळ त्रैमासिकाचे कार्यकारी संपादक डॉ. सतेज दणाणे यांनी एका निवेदनाद्वारे केलेले आहे.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता – डॉ. सतेज दणाणे (भ्र.९४०४७६१४२७), द्वारा नंदिनी दळवी, सम्राटनगर गार्डनच्या मुख्य गेटसमोर, सम्राट नगर, कोल्हापूर

Related posts

महान भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन

पुन्हा नव्याने…

बहुगुणी, औषधी आवळा

Leave a Comment