सध्या महाराष्ट्रात थंडीचा कालावधी दिवसागणिक वाढत आहे. दिवसा उष्णता तर रात्री आणि पहाटे चांगलीच थंडी जाणवत आहे. किमान व कमाल अशी दोन्हीही तापमाने ही सध्य:काळातील सरासरी तापमानांच्या खाली घसरलेले असुन, किमान १२ ते १६ व कमाल ३२ डिग्री से.ग्रेड दरम्यान जाणवत आहे, म्हणून अजूनही थंडी टिकून आहे.
माणिकराव खुळे
विदर्भ –
२५ ते २९ फेब्रुवारी(रविवार ते गुरुवार ) पर्यंतच्या पाच दिवसात संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यात ढगाळलेल्या वातावरणाबरोबर अवकाळी पावसाची शक्यता जाणवते. त्यातही, २५ ते २७ फेब्रुवारी(रविवार ते मंगळवार)दरम्यानच्या पहिल्या तीन दिवसात विजा व गडगडाटासह मध्यम पावसाबरोबर गारपीट होण्याची शक्यताही आहे. विशेषतः अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली ह्या ५ जिल्ह्यात ही शक्यता अधिकच आहे.
मराठवाडा –
मराठवाड्यातील संपूर्ण ८ जिल्ह्यात उद्या दि.२५ ते २७ फेब्रुवारी(रविवार ते मंगळवार) तीन दिवस केवळ ढगाळ वातावरणच राहून गडगडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासहित अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः जालना हिंगोली परभणी व नांदेड ह्या ४ जिल्ह्यात ही शक्यता अधिकच जाणवते.
मध्य महाराष्ट्र –
२६ व २७ फेब्रुवारी (सोमवार – मंगळवार) केवळ दोनच दिवस खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अश्या १० जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी गडगडाटासह व सोसाट्याच्या वाऱ्यासहित तुरळक पावसाची शक्यता जाणवते. ही शक्यता जळगांव जिल्ह्यात अधिक आहे.
कोकण
मुंबईसह कोकणात मात्र पावसाची शक्यता नाही.आकाशही निरभ्र राहील. किमान व कमाल अशी दोन्हीही तापमाने ही सरासरीच्या खाली म्हणजे १६-१८ व ३० डिग्री से.ग्रेड दरम्यान राहून तेथील वातावरण आल्हादायकच जाणवेल.
महाराष्ट्रात थंडी कशी राहील
सध्या महाराष्ट्रात थंडीचा कालावधी दिवसागणिक वाढत आहे. दिवसा उष्णता तर रात्री आणि पहाटे चांगलीच थंडी जाणवत आहे. किमान व कमाल अशी दोन्हीही तापमाने ही सध्य:काळातील सरासरी तापमानांच्या खाली घसरलेले असुन, किमान १२ ते १६ व कमाल ३२ डिग्री से.ग्रेड दरम्यान जाणवत आहे, म्हणून अजूनही थंडी टिकून आहे. थंडी आपला हंगामी कार्यकाळ पूर्ण करून सध्या जाणवत असलेल्या पाणी टंचाईच्या काळात थंडीमुळे रब्बी शेत-पिकांना नकळत काहींशी मदतच मिळत आहे, असे वाटते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.