जन्मा पासून असलेलं पावसाचं आणि आपलं नातं वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळं भेटत जातं. आपल्या बालपणी कागदी होड्या करताना, चिखलात उड्या मारताना तो आपल्यासारखा लहान होतो.पहिल्या प्रेमाची साक्ष देत तर कधी न उलघडणारी विरहाची कोडी देत आपल्या सोबत नकळत मोठा होतो. कधी खिडकीतून डोकावणारा पाऊस तर कधी छतातून टपटपणारा पाऊस. वेगवेगळ्या रूपात तो आपल्या आयुष्यात रुजत असतो. त्याचंही तसच, जन्मापासून मोठं होईपर्यंत कितीतरी रूप घेत बदलत जातो. त्याच्या त्या वळणाचा, बदलत्या रूपाचा असा अतरंगी प्रवास आणि त्या प्रवासाची ही बहुरंगी गोष्ट… पाऊस…… पाऊस फक्त ऋतु नाही तर अवघ्या सृष्टीच चैतन्य आहे..
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.