कुठला चावट भुंगा साताऱ्याचा का सांगा ?
वय तरी बगा पाव्हणं तुमचं वय तरी बगा
पैलवान गडी असून कवळी दिसते मुखात
चमचम चमन गोटा केस ना उरले डोक्यात
शिव्या देतात पोरीसोरी रोजचाच शिमगा
वय तरी बगा पाव्हणं तुमचं वय तरी बगा
गावात सोडून दिला बिनकामाचा टोणगा
मागं मागं फिरून लावत राहतो तो लग्गा
हिरोगिरी नसानसात अनुभव आहे दांडगा
वय तरी बगा पाव्हणं तुमचं वय तरी बगा
मांडे रचतो मनाशी मिळवीन रंभा उर्वशी
बायको असून घरी म्हणतो तरी मी उपाशी
घरीदारी घालतो दंगा कुणी ना म्हणे चंगा
वय तरी बगा पाव्हणं तुमचं वय तरी बगा
विलास कुलकर्णी
मीरा रोड