November 30, 2023
Manisha Patil Poetry Chehara Harawaleya lekee
Home » चेहरा हरवलेल्या लेकी…
कविता

चेहरा हरवलेल्या लेकी…

चेहरा हरवलेल्या लेकी

मैत्रिणी, बहिणी जाताना
घेऊन जातात
मोगऱ्यांचे ऋतू
आणि जुईसारख्या भावजया
येत राहतात घराघरांत
तेव्हा अवघड असते
एखाद्या लेकीने
त्या गावात जन्मभर राहणे

सन्मानाचा पाहुणचार
क्वचितच भेटतो तिला
ती धरली जाते गृहीत
भावकीच्या हरेक विधीत.

नसतो तिच्या पदरात
माहेरच्या हिरवळीवरचा
दोन दिसाचा विसावा…

आपल्याच माहेरात
मुकी मुकी होते लेक
टाळत राहते
बालपणीचे ओळखीचे चेहरे
जपत राहते
कापऱ्या जिवाला…

आटत जातात
मायेचे उमाळे
आईबापानंतर…
आणि हिरव्यागार झाडाची
एक डहाळी
सुकत जाते अकाली.

अजीर्ण होतात लेकी
ठसठसत राहते
तिचे अस्तित्व
माहेरच्या
बदललेल्या उंबरठ्याला…
वाळवीसारखी
कुरतडत राहते तिला
ही उपरेपणाची सल…

परंपरेच्या धरणभिंतींशी
त्या बांधून घेतात स्वतःला
मन्वंतराची दारे
उघडत नाहीत त्यांच्यासाठी
आणि नाकारताही येत नाहीत त्यांना
समष्टीच्या ऋचा…

उभी हयात
पोपडत राहतात
या चेहरा हरवलेल्या
लेकी

हे कसे
कळत नाही
कुणाला…????

कविता – मनीषा पाटील,
देशिंग-हरोली, जि. सांगली
संपर्क – ९७३०४८३०३२

Related posts

महिलांच्या आहारात प्रोबायोटेक्स का असावे ?

देश भयमुक्त करण्यासाठी साहित्यिकांनी बोलायला हवे – रामदास फुटाणे

निसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More