कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी येथील सिद्धगिरी मठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने भाताच्या विविध पारंपारिक वाणांचे संवर्धन करण्यात येत आहे. काही वाण त्यांनी विकसितही केले आहेत. त्यांनी संवर्धित केलेले भाताचे विविध वाण व त्यांची वैशिष्ट्ये…
आसाम बासमती
भाताचा कालावधी : 4 ते 4.5 महीने
भाताची उंची : 4 ते 4.5 फुट
फुटवे: 12 ते 15 फुटवे
बियाण्याचे प्रमाण: एक किलो प्रति 3 गुंठे
भाताची वैशिष्ट्ये: मध्यम व जास्त पावसात येणारे वाण, लांब कुसळी भात
उत्पादन: 45 किलो प्रति गुंठा
हावळा भात
भाताचा कालावधी : 4 महीने
भाताची उंची : 3 ते 4 फुट
फुटवे: 08 ते 12 फुटवे
बियाण्याचे प्रमाण: 1किलो प्रति 3 गुंठे
भाताची वैशिष्ट्ये: कमी व मध्यम पावसात येणारे वाण, जाड दाण्याचा भात
उत्पादन: 60 किलो प्रति गुंठा
गोविंद भोग भात
भाताचा कालावधी : 3.5 ते 4 महीने
भाताची उंची: 3 ते 3.5 फुट
फुटवे: 08 ते 10 फुटवे
बियाण्याचे प्रमाण: एक किलो प्रति चार गुंठे
भाताची वैशिष्ट्ये: कमी व मध्यम पावसात येणारे वाण, लहान आकाराचा सुगंधित तांदूळ
उत्पादन: 45 किलो प्रति गुंठा
जोंधळा जिरगा भात
भाताचा कालावधी: 3.5 ते 4 महीने
भाताची उंची: 3.5 ते 4 फुट
फुटवे : 08 ते 10 फुटवे
बियाण्याचे प्रमाण : एक किलो प्रति आठ गुंठे
भाताची वैशिष्ट्ये : कमी व मध्यम पावसात येणारे वाण, ज्वारीच्या दाण्यासारखा दाणा. सुगंधीत उत्पादन : 40 किलो/गुंठा
फुले समृद्धी
भाताचा कालावधी : 125-130
भाताची उंची : 3 ते 3.5 फुट
फुटवे : 15 ते 18 फुटवे
बियाण्याचे प्रमाण : एक किलो प्रति तीन गुंठे
भाताची वैशिष्ट्ये : मध्यम व जास्त पावसात येणारे आणि सुगंधित वाण, करपा व पर्णकरपा रोगास तसेच खोडकिडीस मध्यम प्रतिकारक
उत्पादन : 50 किलो प्रति गुंठा
काळी गजरी भात
भाताचा कालावधी : 4 ते 4.5 महीने
भाताची उंची : 3.5 ते 4 फुट
फुटवे : 12 ते 15 फुटवे
बियाण्याचे प्रमाण : एक किलो प्रति तीन गुंठे
भाताची वैशिष्ट्ये : मध्यम व जास्त पावसात येणारे सुगंधित वाण, जाडगे भात काडण्यासाठी उत्पादन : 50 किलो प्रति गुंठा
नाचणी भात
भाताचा कालावधी : 3 ते 3.5 महीने
भाताची उंची : 3 ते 3.5 फुट
फुटवे : 12 ते 15 फुटवे
बियाण्याचे प्रमाण : एक किलो प्रति तीन गुंठे
भाताची वैशिष्ट्ये : कमी व मध्यम पावसात येणारे आणि भाकरी बनविण्यासाठी
उत्पादन : 60 किलो प्रति गुंठा
झिंक भात
भाताचा कालावधी : 3 ते 3.5 महीने
भाताची उंची : 3 ते 4 फुट
फुटवे : 08 ते 10 फुटवे
बियाण्याचे प्रमाण : 1किलो प्रति 3 गुंठे
भाताची वैशिष्ट्ये : कमी पावसात येणारे, गर्भवती महिला लहान मुलांसाठी उपयुक्त वाण
उत्पादन : 60 किलो प्रति गुंठा
दिल्ली भात
भाताचा कालावधी : 3.5 ते 4 महीने
भाताची उंची : 4 ते 4.5 फुट
फुटवे : 10ते 12 फुटवे
बियाण्याचे प्रमाण : 1 किलो/3 गुंठे
भाताची वैशिष्ट्ये : मध्यम पावसात येणारे वाण.
उत्पादन: 50 किलो प्रति गुंठा
रत्नागिरी 24
भाताचा कालावधी : 115-120 दिवस
भाताची उंची : 3.5 ते 4 फुट
फुटवे : 12 ते 15 फुटवे
बियाण्याचे प्रमाण : एक किलो / 3 गुंठे
भाताची वैशिष्ट्ये : मध्यम व जास्त पावसात येणारे आणि सुगंधित वाण
उत्पादन : 50 किलो/गुंठा
रक्तशाळी भात
भाताचा कालावधी : 3 ते 3.5 महीने
भाताची ऊंची : 3 ते 3.5 फुट
फुटवे : 08 ते 12 फुटवे
बियाण्याचे प्रमाण : किलो/3 गुंठे
भाताची वैशिष्ट्ये : कमी पावसात येणारे वाण, मधुमेह, कर्करोग व सांधेदुखीसाठी उपयुक्त उत्पादन : 60 किलो/गुंठ
तांबडी कर्जत भात
भाताचा कालावधी : 3 ते 3.5 महीने
भाताची ऊंची : 3.5 ते 4.5 फुट
फुटवे : 10 ते 12 फुटवे
बियाण्याचे प्रमाण : किलो/3 गुंठे
भाताची वैशिष्ट्ये : कमी, मध्यम व जास्त पावसात येणारे आणि सुगधित व चविष्ट वाण
उत्पादन : 65 किलो/गुंठा
काळा जिरगा भात
भाताचा कालावधी: 4 महीने
भाताची ऊंची : 3.5 ते 4.5 फुट
फुटवे : 12 ते 15 फुटवे
बियाण्याचे प्रमाण : किलो/3 गुंठे
भाताची वैशिष्ट्ये : मध्यम व जास्त पावसात येणारे आणि सुगधित व कॅल्शियम युक्त वाण
उत्पादन : 50 किलो/गुंठा
षष्ठीशाळी भात
भाताचा कालावधी : 3 ते 3.5 महीने
भाताची ऊंची: 5 ते 6 फुट
फुटवे: 8 ते 12 फुटवे
बियाण्याचे प्रमाण: किलो/3 गुंठे
भाताची वैशिष्ट्ये : मध्यम व जास्त पावसात येणारे, सुगंधित सांधेदुखीसाठी उपयुक्त वाण
उत्पादन: 60 किलो/गुंठा
काळे भात
भाताचा कालावधी : 6 महीने
भाताची ऊंची: 4 ते 4.5 फुट
फुटवे: 20 ते 25 फुटवे
बियाण्याचे प्रमाण: किलो/3 गुंठे
भाताची वैशिष्ट्ये : जास्त पावसात येणारे वाण, दाण्यांचा रंग काळा
उत्पादन: 60 किलो/गुंठा
सिद्धगिरी – 1 भात
भाताचा कालावधी : 4.5 ते 5 महीने
भाताची ऊंची: 4 ते 5 फुट
फुटवे: 20 ते 25 फुटवे
बियाण्याचे प्रमाण: किलो/5 गुंठे
भाताची वैशिष्ट्ये : कमी, मध्यम व जास्त पावसात येणारे वाण, खाण्यास चविष्ट वाण
उत्पादन: 60 किलो/गुंठा
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.