📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 28, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गायींच्या गर्भधारणेचा प्रश्न सुटणार? गोव्यात पोषण-संप्रेरक उपचारांवर भर

ICAR KVK Goa farmer meet on nutri-hormonal treatment for repeat breeding in dairy cows and sustainable farming

गोव्यातील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) कृषी विज्ञान केंद्राने (KVK) दुभत्या गायींच्या रिपीट ब्रीडिंगच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी आहार आणि संप्रेरके उपचारांवर आधारित ‘खेत बचाओ अभियाना’सह-शेतकरी मेळाव्याचेच केले आयोजन

पणजी – गोव्यातील भारतीय कृषि संशोधन परिषद (ICAR) आणि केंद्रीय किनारपट्टी कृषी संशोधन संस्थेच्या (CCARI) कृषि विज्ञान केंद्राने, उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यातल्या ईब्रामपूर गावात ‘शेती वाचवा अभियानासह – शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम दुभत्या गाईंमधील ‘रिपीट ब्रीडिंग’ समस्येच्या व्यवस्थापनासाठी ‘पोषण-संप्रेरक उपचार पद्धती’ (न्यूट्रि-हॉर्मोनल थेरपी) या विषयावर केंद्रित होता. हा उपक्रम उत्तर गोव्यातील ‘कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था’ (ATMA), गोवा सरकारचे कृषी संचालनालय, गोवा राज्य सहकारी बँक, श्री सातेरी सहकारी दुग्ध संस्था आणि इब्रामपूर येथील श्री राष्ट्रोली स्वयं-सहायता गट यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता.

पेडणे येथील क्षेत्रीय कृषी अधिकारी रुद्रेश कांबळी यांनी ‘खेती बचाओ अभियान’ची उद्दिष्टे आणि महत्त्व स्पष्ट करताना, मातीच्या आरोग्याचे संरक्षण, खतांचा अतिरिक्त आणि असंतुलित वापर टाळणे, मृदा परीक्षण-आधारित शिफारसींचे पालन करणे आणि सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे यांचे महत्त्व अधोरेखित केले. गोवा सरकारच्या कृषी विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध योजना आणि अनुदानाबद्दलही त्यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली.

आयसीएआर-केव्हीकेच्या उत्तर गोव्याचे विषय विशेषज्ञ (पशु विज्ञान) डॉ. संजयकुमार उधरवार यांनी सुधारित प्रजनन आणि पोषण व्यवस्थापनाद्वारे संकरित गायींमध्ये रिपीट ब्रीडींगची समस्या रोखण्यासाठीच्या आणि त्यावर मार्ग काढण्यासाठीच्या वैज्ञानिक दृष्टिकोनावर प्रकाश टाकला. त्यांनी आयसीएआर-सीसीएआरआयने शिफारस केलेल्या ‘पोषण-संप्रेरक उपचार पद्धती’ची माहिती दिली, ज्यात इब्रामपूरमधील अनेक डेअरी फार्म्समध्ये गर्भधारणा दर अंदाजे 66% इतका नोंदवला गेला आहे. पशुधन व्यवस्थापनाला ‘खेती बचाओ’ अभियानाशी जोडत त्यांनी पीक उत्पादन आणि दुग्ध व्यवसायाच्या पूरक भूमिकांचे महत्व विषद केले. मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी, शेतीच्या संसाधनांचा पुनर्वापर करण्यासाठी आणि रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी त्यांनी गुरांचे शेण, मूत्र, गांडूळखत आणि शेतातील कचऱ्याचा वापर, याविषयी सांगितले. संसाधनांचा कार्यक्षम वापर, शाश्वत उत्पादन आणि वाढीव उत्पन्न यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना एकात्मिक पीक-पशुधन शेती पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित केले.

पेडणे जिल्ह्यातील नागझार येथील गोवा राज्य सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रशांत टक्कर यांनी शेतकऱ्यांना त्यांचे कृषी उद्योग बळकट करण्यासाठी संस्थात्मक कर्जसुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. इब्रामपूरमधील शेतकरी सुधीर धौसकर यांनी दुग्ध व्यवसाय आणि गांडूळखत निर्मिती व्यवसायातील त्यांची यशोगाथा सांगितली. शेतातील सेंद्रिय कचऱ्याचे रूपांतर पोषक घटकांनी युक्त खतामध्ये करण्याचे फायदे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या अनुभवांतून प्रेरणा घेऊन, जमिनीचा कस सुधारण्यासाठी, शेतातील कचरा कमी करण्यासाठी आणि अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी गांडूळ खत निर्मितीचा अवलंब करण्याचे प्रोत्साहन इतर शेतकऱ्यांनाही मिळाले.

या कार्यक्रमाचा भाग म्हणून, गोवा सरकारच्या कृषी विभागाच्या वतीने, शेतकऱ्यांना हाताने चालणारी फवारणी यंत्रे आणि गांडूळ खताचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात 40 शेतकरी (21 पुरुष आणि 19 महिला) आणि सात अधिकाऱ्यांसह एकूण 47 जण सहभागी झाले होते.

Related posts

अशी करा बीजोत्पादन कांदा पिकातील कापणी आणि मळणी

उसाच्या पाचटापासून मिळवा उत्तम सेंद्रिय खत

कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा किसान सभेकडून निषेध

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406