September 8, 2024
Do this seed production harvesting and threshing in onion crop
Home » अशी करा बीजोत्पादन कांदा पिकातील कापणी आणि मळणी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अशी करा बीजोत्पादन कांदा पिकातील कापणी आणि मळणी

बीजोत्पादन पिकातील कापणी आणि मळणी

  • कांद्याच्या गोंड्यात एकाच वेळी सर्व बी पक्व होत नाही. बियांचे गोंडे काढणीला आल्यावर त्याचा रंग तपकिरी होतो व बियांचे आवरण (कॅप्सूल)फाटून त्यात काळपट बी दिसू लागते.
  • गोंड्यात असे ५ ते १० टक्के कॅप्सूल फाटून बी दिसायला लागले तर समजावे बी परिपक्व झालेले आहे. गोंडे जसजसे तयार होतील तसतसे काढून घ्यावेत. सामान्यतः ३ ते ५ वेळा गोंड्याची काढणी हाताने करावी लागते.
  • सकाळच्या वेळी काढणी करावी, जेणेकरून वातावरणातील आद्रता व गोंड्यावर हलकासा ओलसरपणा असल्याने बी गळून पडत नाही.
  • गोंडे काढल्यानंतर ताडपत्रीवर पसरवून ५ ते ६ दिवस उन्हात चांगले सुकवून घ्यावे. गोंडे सुकवताना ते ३ ते ४ वेळा वरखाली करावेत.
  • गोंडे जर चांगले सुकले नाही तर बी मळणी अवघड होते व बियांवर सालपट चिटकून राहिल्याने त्याची भौतिक शुद्धता कमी होते.
  • चांगले सुकलेल्या गोंड्यामधून बी हळू हळू कुटून वेगळे करावे. त्यानंतर उफणनी करून बी स्वच्छ करावे .
  • हलके, फुटलेले, पोचट बी चाळणीच्या साहाय्याने अथवा प्रतवारी यंत्राच्या सहाय्याने वेगळे करून उत्तम प्रतीचे बी एकत्र करावे.
  • अधिक माहितीसाठी संपर्क –
    डॉ. राजीव काळे, डॉ. एस एस गडगे, कांदा व लसूण संशोधन संचालनालय, पुणे

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

रेशीम एक शेतीपूरक उद्योग

सत्तेगणिक निष्ठा बदलणाऱ्या चिंबोरीवृत्तीच्या माणसांची ही कथा

एकनाथ पाटील यांची कविता सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading