March 5, 2024
Goverment steps For the safety of animals living along the tracks
Home » रुळांलगत वावरणाऱ्या प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी…
काय चाललयं अवतीभवती

रुळांलगत वावरणाऱ्या प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी…

रेल्वे रुळांलगत वावरणाऱ्या प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने काही ठोस पावले उचललेली आहेत, अशी माहिती रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

रेल्वे रुळांवर येणाऱ्या प्राण्यांच्या मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी विभागीय रेल्वेने अनेक प्रतिबंधात्मक उपाय केले आहेत,  यामध्ये करण्यात येणारे उपाय असे…

 •  कचरा साफ करणे आणि रेल्वे मार्गांजवळील जंगली झुडपे काढून टाकणे.
 •  गुरे/प्राणी येण्याची जास्त शक्यता असलेल्या भागात वारंवार शिट्टी वाजवून प्राण्यांना त्या  मार्गांवरून बाजूला करण्यासाठी, रेल्वेगाडीतील कर्मचाऱ्यांमध्ये नियमितपणे जागरुकता निर्माण करणे.
 • प्रमुख शहरांच्या जवळ तसेच गुरे/प्राणी जेथे हमखास रेल्वमार्ग ओलांडतात,अशा ठिकाणी कुंपण/सीमा भिंत बांधणे.
 • गावागावांतून गुरे रुळावर येऊ नयेत याची काळजी घेण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यासाठी चर्चासत्र/प्रचाराद्वारे ग्रामस्थांचे समुपदेशन करणे.
 • रेल्वे ट्रॅकजवळ जनावरांचे कळप येऊ नयेत यासाठी रेल्वे रुळावर अन्नाचा कचरा टाकण्याचे टाळणे.

वनक्षेत्रातून जाणाऱ्या रेल्वेमार्गांवरही अशाप्रकारे अनेक पावले उचलण्यात आली आहेत,  त्यामधील प्रमुख मुद्दे असे….

 • अपघातप्रवण ठिकाणी  वेगावर प्रतिबंध घालणे.
 • रेल्वेगाडी चालकांना हत्ती आणि इतर प्राण्यांच्या उपस्थितीबद्दल सावध करण्यासाठी योग्य ठिकाणी खुणांचे बोर्ड लावणे.
 • गरजेच्या तुरळक ठिकाणी कुंपण घालण्याची तरतूद करणे.
 • हत्ती ओलांडून जाण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी नाविन्यपूर्ण अशा पध्दतीने मधमाशांचा आवाज ऐकू येईल, अशी व्यवस्था करणे.
 • परिसरातील वन अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून अपघात प्रवण ठिकाणी वन्यजीवांच्या हालचालीसाठी भुयारे आणि उंचवटे बांधणे.
 • स्टेशन मास्तर आणि लोको पायलट यांना सावध करून वेळेवर सूचना देण्यासाठी रेल्वे नियंत्रण कार्यालयांमधे वन विभागाचे कर्मचारी आणि हत्तींचा मागोवा घेणारे यांच्याशी  संपर्क करून त्यांना नियुक्त करण्यात आले आहे.

Related posts

कुसुमाग्रजांच्या शोधात…सौमित्र’

प्रसार माध्यमातील नव्या बलाढ्य युती बाबत

चित्तात सद्गुरुंची नित्य अनुभुती हाच प्रसाद

Leave a Comment