चंदन बटवा…नियमित खा.
हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मिळणारी ही भाजी गुणकारी आहे. यात चांगल्यापैकी प्रोटीन आहे. चंदन बटवा सगळ्या भारतात विविध नावाने ओळखली जाते. बथुवा, चक्रवर्ती ! भाजीत सोडियम चांगल्या प्रमाणात आहे. यात व्हिटॅमिन ए खूप आहे , त्यामुळे डोळ्यांसाठी उपयुक्त आहे. भाजीत व्हिटॅमिन सी भरपूर आहे. तसेच व्हिटॅमिन बी आहे. यात फॉस्फरसचे चांगले प्रमाण आहे. झिंक आहे. फॉलीक एसिड आहे, हिमोग्लोबिन वाढते. एवढी गुणी भाजी आपण मात्र कधीतरीच खातो. हृदय मित्र म्हणून या भाजीला ओळखतात. मुलांच्या वाढीसाठी ही भाजी खूप उत्तम आहे.
डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक, ताराबाई पार्क,
सासने ग्राउंड जवळ, कोल्हापूर
9623895866
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.