May 23, 2024
पर्यटन

“चांदवडचा होळकरवाडा” – रंगमहाल

अहिल्याबाईंंच्या या स्मृती जतन करायला हव्यात वास्तुकला शास्त्रज्ञाकडुन अहिल्यादेवींंनी घेतलेला सल्ला व त्या दृष्टीने  झालेल्या असंख्य घाट, मंदिरे यांची निर्मिती (महेश्वर ते काशी) आजही टवटवीत आहेत. दुष्काळात अनेकाच्या हाताला काम, कलादुष्टी असलेल्या कलाकारांच्या कलेला वाव व लोकांचे, प्रजेचे सार्वजनिक कल्याण हाच त्यांचा उद्दात हेतू होता.

अहिल्याबाई होळकराच्या कारकिर्दीत स्थापत्य, चित्रकला व कलेला प्रोत्साहन दिले गेले. वास्तुशास्त्रज्ञ चिंतामण कांड म्हणतात, “मराठा राज्याच्या नावावर भव्य वास्तु देवळे किंवा राजवाडे नाहीत. दक्षिण भारत आणि राजस्थान येथे अशा वास्तु निर्माण केल्या. मोगलांच्या नावावरही भव्य वास्तु आहेत. पण मराठा राजे आणि इतर राजांनी जे कार्य केले नाही ते अहिल्याबाईंंनी करून दाखविले. हे कार्य फक्त स्वतःच्या राज्यातच नाही तर इतरही राज्यात, संपूर्ण हिंदुस्थानात (रामेश्वरम-काशिविश्वेशर) केले आहे. मराठी माणसांला याचा अभिमान असायला हवा”

अहिल्याबाईंंच्या या स्मृती जतन करायला हव्यात वास्तुकला शास्त्रज्ञाकडुन अहिल्यादेवींंनी घेतलेला सल्ला व त्या दृष्टीने  झालेल्या असंख्य घाट, मंदिरे यांची निर्मिती (महेश्वर ते काशी) आजही टवटवीत आहेत. दुष्काळात अनेकाच्या हाताला काम, कलादुष्टी असलेल्या कलाकारांच्या कलेला वाव व लोकांचे, प्रजेचे सार्वजनिक कल्याण हाच त्यांचा उद्दात हेतू होता. उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रातील  चांदवड (नाशिक) उपराजधानी ही त्यांच्या कारकिर्दीतील एक स्थापत्याची उत्तम नगरी मानली जाते.

चांदवडला अहिल्याबाईंंचे दोन वाडे आहेत. एक जुना वाडा, तर नवा वाडा म्हणजे ‘रंगमहाल’ आहे. रंगमहाल तीन मजली आहे. संपूर्ण काम लाकडात केले असून लाकडावर सुंदर नक्षीकाम आहे. रंगमहालाची चित्र अप्रतिम आहेत. सर्व राजपूत शैलीत असून रामायण, महाभारतातील प्रसंग आहेत. मात्र या चित्रांत स्त्री पुरुषांची वेशभूषा मराठेशाहीची आहे, युद्ध दृशांचे चित्रांकणही मराठा मेवाड शैलीत आहे. वाडा १०० फुट ऊंच आहे. दगडी कमान प्रवेशद्वार  व आजुबाजुला चार एकर परीसरात भव्य दगडी तटबंदी केलेली आहे. या वास्तुबरोबरच अनेक विहीरीचे बांधकाम केले आहे.       

चांदवड येथे बांधलेल्या विहिरी वैशिष्ट्यपूर्ण असुन रंगमहालाच्या बाजूला असलेली विहीर सुंदर व प्रेक्षनिय आहे. मुख्य इमारतीच्या पश्चिमेला असलेली ही ऐतिहासिक विहीर कित्येक दुष्काळात चांदवडला, अनेक गावाला पाणी पुरविण्यात आले. विहीरीला एकदंरीत तीन कमाणी आहेत. विहिरीत उतरत जाणाऱ्या पायऱ्यांनी चौकोनी चिरेबंदी हौदात संपतात. हा हौद  २०/३० फूट खोल आहे नंतर ६×८ चा कुंड आहे. त्यातील कधीही न संपनाऱ्या जलामुळे खोलीचा अंदाज येत नाही. नरोटी बारव, विठोबा बारव, गढीबाग ही विहिर दोन मजली असून ५० पायऱ्या आहेत. बांधकाम काळ्याघडीव दगडांचे आहेत.

रेणुका मंदीराजवळील एक पायविहीर व शिलालेख कोरलेला आहे.अशाच अनेक विहिरी लोकोपयोगी कर्तृत्व बुद्धीने बांधल्या आहेत. एकुणच अहिल्याबाईंंचा दुरदर्शीपणा, कला व सांस्कृतीकतेची जोड व दृष्टीकोन लोकहितार्थ व्यापक होता.

संदर्भ – History of Malwa – S. K. Bhatt.

चांदवड स्मरणिका – एस. के. पवार.

माहिती साभार – वर्षा मिश्रा (Varsha Mishra)

Related posts

नमस्कार माझा त्या तुला अहिल्ये..

महाराष्ट्राची दुर्गपंढरी – एक विक्रम वारी

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406