मन आनंदी ठेवण्यासाठी काय करायला हवं. हा प्रश्न सर्वांनाच पडतो. खचलेल्या मनाला उभारी देण्यासाठी काहीजण अध्यात्माचा आधार घेतात. पण प्रत्येकजण धार्मिक असतोच असे नाही. मग काय करायला हवं ? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर आणि पाहा व्हिडिओ…
स्मिता पाटील
खरंच झाडाच्या संवर्धन संगोपनातून आपणाला उर्जा मिळते. ती कशी ? एखाद्या पाळीव प्राण्यासारखे झाडे आपले प्रेम व्यक्त करू शकत नाहीत. पण जेव्हा आपण त्याची काळजी घेतो. त्यातून जो आनंद मिळतो तो दिवसभर आपल्यात राहातो. म्हणजेच एखाद्यावर आपण प्रेम केले तर त्यातून आपणासही प्रेम मिळते. आनंद मिळतो. तो आपल्या मनाला निश्चितच उभारी देतो. गार्डनिंगच्या कामातून आपणाला ही उर्जा मिळते.
गार्डनिंग हे आपल्यामध्ये पालकत्वाची भावना निर्माण करते. झाडांना वेळच्यावेळी पाणी देणे. त्याची काळजी घेणे. किड-रोग असतील तर त्यापासून त्याचे संरक्षण करणे. त्याची वाढ चांगली व्हावी यासाठी योग्य ते उपाय करणे. म्हणजे या कामातून आपल्यात पालकत्वाची भावना उत्पन्न होते. त्याची जाणीव निर्माण होते.
ज्या झाडांची आपण काळजी घेतो. त्याला जेव्हा फळे आणि फुले येतात. त्यातून आपणामध्ये आत्मविश्वास वाढतो. गार्डनिंगच्या कामातून आत्मविश्वास वाढण्यासाठी निश्चितच उर्जा मिळते.
गार्डनिंग करणे ही एक प्रक्रिया आहे. आज आपण झाड लावले आणि उद्या लगेच त्याला फळे , फुले लागली असे होत नाही. त्याची काळजी घ्यावी लागते. त्याला वेळच्यावेळी पाणी, खत द्यावे लागते. मग आपणाला फुले, फळे लागण्यासाठी थोडी वाट पाहावी लागते. या कामातून आपणामध्ये सहनशिलता वाढण्यास मदत होते. चिकाटी वाढते. आपणामध्ये यातून कष्ट करण्याची प्रवृत्ती वाढते.
झाडांची काळजी आपणाला एकाद्या सजिव गोष्टींसाठी घ्यावी लागते. जेव्हा आपण त्याची काळजी घेतो तेव्हा ती बहरतात. प्रत्येक रंगाचे वैशिष्ट्ये आहे. हिरवा रंग आपल्या मनास शांती देतो. बहरलेला हिरवागार वृक्ष आपण जेव्हा पाहतो. तेव्हा आपणातील थकवा हा दूर निघून जाऊन मनाला थोडा आराम मिळतो. चीडचीड, क्रोध, मत्सर, मानसिंक संतूलन जाणे, तणाव यापासून निश्चितच मुक्ती मिळते. गार्डनमधील हिरवागार बहर पाहूनही आपल्या डोळ्यांना आराम मिळतो. हिरवेगार बहरलेले शेत पाहूनही मनाला एक उभारी मिळते. उत्साह वाढतो. यासाठी निश्चितच आपण गार्डनिंगमध्ये आपला वेळ घालवून आपणास आलेला थकवा, मनाची झालेली घालमेल दूर घालवून आनंदी व्हा. आरोग्यासाठी आनंदी असणे हे अत्यंत आवश्यक आहे. आनंदी मन सर्व रोगावरील जालिम औषध आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.