April 24, 2024
Invitation to send books for Sant Vangmay Award of Matri Mandir
Home » मातृमंदिरच्या संत वाङ्मय पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

मातृमंदिरच्या संत वाङ्मय पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

पुणे – मातृमंदिर विश्वस्त संस्था प्रतिवर्षी संत वाङ्मय अभ्यासावर आधारित स्पर्धा घेत असते. शालेय विद्यार्थी आणि अध्यापक यांना संत वाङ्मयाचा अभ्यास करण्यासाठी विपुल साहित्य उपलब्ध झाले पाहिजे असे वाटते. असें वाङ्मय विविध शाळांना सुचवता यावे, वाङ्मय वाचकांसमोर ठेवणारे लेखक आणि प्रकाशक यांना प्रोत्साहन देता यावे, त्यासाठी पुरस्कार देण्याच्या निमित्ताने लेखक आणि प्रकाशक वाचकांसमोर यावेत या हेतूने संत वाङ्मयविषयक पुस्तकांना पुरस्कार देण्याचे संस्थेने ठरवले आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा प्रतिवर्षी मातृमंदिर वर्धापनदिनी म्हणजे सौर १ मार्गशीर्ष ( २२ नोव्हेंबर ) या दिवशी ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी, पुणे ४४ या ठिकाणी आयोजित केला जातो, अशी माहिती सु. मा. कुलकर्णी यांनी दिली आहे.

मागील दोन सौर वर्षात प्रकाशित झालेल्या संतविषयक मराठी साहित्याचा पुरस्कारासाठी विचार केला जातो.  यामध्ये  संत साहित्याचे परीक्षण ( टीका, विवेचन ) संतचरित्रे, संताच्या कार्यावरील विवेचनात्मक लेखन, संत जीवनावर आधारित ललित साहित्य ( कथा, कादंबरी, काव्यकोश इत्यादी सर्व प्रकारचे साहित्य) पुरस्कारासाठी दोन प्रतीत पाठवावे.  १०० पेक्षा अधिक पृष्ठांच्या मोठ्‌या सर्वोत्कृष्ट दोन पुस्तकांना अनुक्रमे रु. १०,००० आणि रु.८०००  असें दोन पुरस्कार (६० टक्के लेखकांस आणि ४० टक्के प्रकाशकांस ) दिले जाईल. त्याशिवाय बालवाङ्मयातील ( १०० पृष्ठांच्या आतील) संतकथा, संतचरित्र, संतवचनसंग्रह अशा स्वरूपातील दोन पुस्तकांना प्रत्येकी रु.२५०० चे (६० टक्के लेखकांस आणि ४० टक्के प्रकाशकांस ) पुरस्कार दिले जातील.  

संतसाहित्याचे समीक्षक किंवा लेखक अशा तीन ख्यातनाम तज्ज्ञाच्या समितीकडून परीक्षण करून पुरस्कार पात्रतेचा निर्णय केला जातो. पुरस्कारासाठी पाठविण्याच्या प्रत्येक पुस्तकाच्या दोन प्रती सौर २४ श्रावण (१५ ऑगस्ट) पर्यंत संस्थेच्या पत्त्यावर पोहोचणे आवश्यक आहे. पुस्तके मराठी भाषेतील तथापि कोणत्याही भारतीय संताविषयीची असावीत. संत कोणत्याही कालखंडातील असले तरी चालेल. विद्यमान संतांची, त्यांनी लिहिलेली किंवा त्यांच्या विषयीची पुस्तके पुरस्कारासाठी विचारात घेता येतील, अशी माहिती सु. मा. कुलकर्णी यांनी दिली आहे.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
मातृमंदिर विश्वस्त संस्था, द्वारा – ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, पेठ क्र. २५, निगडी, पुणे ४११०४४
दूरभाष क्र. २७१६८००० / ९७६५१३५७६९

Related posts

लाल चंदनाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारा निर्णय

भारूड : नृत्यनाट्याद्वारे सोप्या शब्दांत अध्यात्माची शिकवण देणारा काव्यप्रकार

प्रातिनिधिक लोकशाही लोकप्रिय ! मोदींना तिसऱ्यांदा पसंती !!

Leave a Comment