January 24, 2025
Rakhi made From Coconut waste Hasan Khan Malvan
Home » नारळाच्या करवंटीपासून राखी…
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नारळाच्या करवंटीपासून राखी…

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने पर्यावरणास घातक वस्तूंना पर्यावरणपूरक वस्तूंची निर्मिती करून पर्यावरण स्नेही निर्माण करणे हा मुख्य उद्देश ठेऊन विकल्पची कल्पना आम्ही राबवली आहे.

हसन युसूफ खान

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय ,
मालवण, जिल्हा :- सिंधुदुर्ग

नि सर्ग हा सदैव मानवास मदत करण्यास उभा असतो पण आपण फक्त त्याचा गैरवापर करतो. निसर्गावर आपण फार आघात केले आहेत की, स्वतःलाच संकटात टाकत आहोत. दैनंदिन जीवनात आपण अशा अनेक वस्तू वापरतो की ज्या निसर्गावर आघात करतात. पर्यायाने त्याचा परिणाम आपल्याच जीवनावर होतो. अनेकवेळा असे बोलले जाते की, पर्यावरण घातक वस्तूंना पर्याय नाही. आम्ही त्या वस्तू वापरतो याच मुद्द्याचा विचार करून आम्ही या आघात करणाऱ्या वस्तुंना पर्याय आणण्याचा आमच्या विकल्प या हरित व्यवसायातून प्रयत्न करत आहोत.

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने पर्यावरणास घातक वस्तूंना पर्यावरण पूरक वस्तूंची निर्मिती करून पर्यावरण स्नेही निर्माण करणे हा मुख्य उद्देश ठेऊन विकल्पची कल्पना आम्ही राबवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळ मोठ्या प्रमाणात परंतु त्याच्या करवट्यांचा योग्य वापर केला जात नव्हता. चुलीमधील इंधन म्हणूनच जास्त वापर केला जातो. याचा विचार करून आठ रुपये प्रति किलोने आम्ही करवंट्या घेऊन त्याच्यापासून विविध आकर्षक वस्तूंच्या निर्मितीचा विचार केला.

करवंटीमधून अनेक हरित वस्तूंची निर्मिती केली. यातून कार्बन फुटप्रिंट तर कमी होण्यास मदत होत आहेच. तसेच त्याच बरोबर प्लास्टिकला पर्यायी वस्तू देखील उपलब्ध करण्यात येत आहेत. निसर्गाच्या अस्तित्वावर आपले अस्तित्व अवलंबून आहे. पण प्लास्टीकच्या विळख्यात आपण स्वतःला अडकून ठेवले आहे. प्लास्टिकला पर्याय शोधणे, ही विकल्पची प्राथमिकता आहे. यातूनच नारळाच्या करवंटीपासून पर्यावरणपुरक अशा आकर्षक राख्या आम्ही तयार केल्या आहेत. विशेष म्हणजे या महाविद्यालयीन युवकांना यामध्ये सहभागी करून हा उपक्रम राबविला आहे. यातून पर्यावरणाबाबत युवकांत जागृती केली जात आहे. तसेच स्वयं रोजगाराचीही त्यांना प्रेरणा देण्याचे काम होत आहे.

मुलांमध्ये अनेक सुप्त कलागुण आणि कौशल्य असतात पण महाविद्यालयीन अभ्यासक्रमात हे बहरणे शक्य नसते. अशा कौशल्यपूर्ण प्रामाणिक मुलांचा शोध घेणे, त्यांना स्वतः प्रशिक्षण देणे आणि त्यांचे कौशल्य बहरून आणण्यासाठी आम्ही हुनर की पाठशाळा हा उपक्रम सुरु केला आहे. मी, माझी पत्नी अमरीन आणि नवनीत मेस्त्री, पायल शिरपूटे, मधुरा ओरस्कर, अजय आळवे हे सर्वजण उपक्रमात सहभागी आहोत.
हसन युसूफ खान

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय ,
मालवण, जिल्हा :- सिंधुदुर्ग

राख्यांचे वैशिष्ट्य :-

  1. नारळाच्या करवंटीचा वापर करून निर्मिती
  2. राख्यांमध्ये बिया म्हणजे रक्षाबंधन नंतर कुंडीमधून किंवा मातीखाली घातल्यावर काही दिवसात त्यामधून झाड येईल. ( बिया फुलपाखरांच्या नेक्टर प्लांटच्या आहेत )
  3. नारळाच्या झावळ्यापासून राखीसाठी इको पॅकिंग बॉक्स.
  4. संपूर्ण महाराष्ट्रामधून ऑर्डर असून गोवा, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश आदी राज्यांसोबत लंडनमधून देखील राख्यांना मागणी.

राख्यांच्यासाठी येथे साधा संपर्क –

7875428653
8275390652 (व्हाट्सअँप)
7378984406 (गुगल पे )
ईमेल : vikalpeco09@mail.com


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading