October 14, 2024
Konkan Marathi Sahitya Parishad Vandmay award
Home » Privacy Policy » कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे वाङमय पुरस्कारांसाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे वाङमय पुरस्कारांसाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे (कोमसाप) कोकणातील सभासद साहित्यिकांना विविध वाङमयीन व वाङमयेतर पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. २०२२-२३ साठी घोषित होणाऱ्या पुरस्कारांसाठी पुस्तके मागविण्यात येत आहेत.

हे सर्व पुरस्कार ‘कोमसाप’च्या कोकणातील सभासद लेखकांसाठी आहेत. या पुरस्कारांमध्ये प्रथम श्रेणीचे सात, विशेष सात पुरस्कार आणि वाङमयेतर बारा पुरस्कार दिले जाणार आहेत. प्रथम श्रेणी पुरस्कारात र. वा. दिघे कादंबरी पुरस्कार, वि. सी. गुर्जर कथासंग्रह पुरस्कार, आरती प्रभू कविता संग्रह पुरस्कार, अनंत काणेकर ललित गद्य पुरस्कार, प्रभाकर पाध्ये समीक्षा पुरस्कार, धनंजय कीर चरित्र पुरस्कार, भाई भगत चित्रपट- नाट्य विषयक पुरस्कार यांचा समावेश आहे. तर सौ. लक्ष्मीबाई व न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे ललित गद्य पुरस्कारासाठी कोकणासह गोवा-कारवार-बेळगाव या प्रदेशातील लेखकांचाही विचार केला जाणार आहे.

विशेष पुरस्कार देखील लेखनाच्या सात प्रकारांत दिले जाणार आहेत. त्यामध्ये कादंबरी, कथा, कविता, बालवाङमय, संकीर्ण गद्य, नाटक-एकांकिका, वैचारिक यांचा समावेश आहे. यामध्ये वि. वा. हडप कादंबरी पुरस्कार, विद्याधर भागवत कथा संग्रह पुरस्कार, वसंत सावंत कविता संग्रह पुरस्कार, श्रीकांत शेटे चरित्र-आत्मचरित्र पुरस्कार, प्र. श्री. नेरुरकर बालवाङमय पुरस्कार, वि. कृ. नेरुरकर संकीर्ण वाङमय पुरस्कार, अरुण आठवले संकीर्ण वाङमय पुरस्कार, रमेश कीर नाटक-एकांकिका पुरस्कार, वैचारिक साहित्यासाठी फादर स्टीफन सुवार्ता वसई पुरस्कार या पुरस्कारांचा समावेश आहे.

पुरस्कारासाठी आपल्या पुस्तकाच्या दोन प्रती ३१ जानेवारीपूर्वी केंद्रीय कार्यवाह, कवी केशवसुत स्मारक संकुल, मालगुंड, पो. मालगुंड ता. जि. रत्नागिरी या पत्त्यावर पाठवावेत. अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. सोबत कोमसाप जिल्हाध्यक्ष अथवा शाखाध्यक्षांचे प्रमाणपत्र किंवा सभासद पावतीची छायांकित प्रत यासोबत जोडणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त सभासदांनी पुस्तके पाठविण्याचे आवाहन कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, पुरस्कार समितीचे प्रमुख प्रा. अशोक ठाकूर यांनी केले आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading