April 24, 2024
Gavgada Literature award Vadshivane solapur
Home » गावगाडा साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

गावगाडा साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

सोलापूर : वडशिवणे (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने ग्रामीण लोकमानस आणि लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या मराठीतील दर्जेदार साहित्यकृतींना गावगाडा साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. यंदा कवितासंग्रह, समीक्षा ग्रंथ, कथा संग्रह, कादंबरी या साहित्य प्रकारांची निवड करण्यात येणार आहे. पुरस्काराचे हे १३ वे वर्ष आहे. तरी २०२२ ते २३ या वर्षातील आपले साहित्य साहित्यिकांनी १५ जानेवारी २०२४ पर्यंत पाठवावे, असे आवाहन सोमनाथ टकले यांनी केले आहे.

गावगाडा साहित्य पुरस्कारासाठी कवितासंग्रह, मातोश्री चांगुणाबाई सिद्धाराम इंगळे स्मृती पुरस्कारासाठी समीक्षा ग्रंथ, रुक्मिणी पांडुरंग भोसले स्मृति पुरस्कारासाठी कथासंग्रह, रत्नमाला बबन पिसाळ स्मृती पुरस्कारासाठी कादंबरी हा साहित्य प्रकार निश्चित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ,सन्मानचिन्ह,, रोखरक्कम असे आहे. तरी साहित्यिकांनी पुस्तकाच्या दोन प्रती, अल्पपरिचय, छायाचित्र पाठवावेत.

गावगाडातर्फे आत्तापर्यंत भागवत बावळे (२०११), अर्जुन होटकर (२०१२), कल्पना दुधाळ (२०१३), पार्थ पोळके (२०१४), सतीश दराडे (२०१५), ऐश्वर्या पाटेकर (२०१६), रावसाहेब कुवर (२०१७), तुकाराम पाटील (२०१८), दिनकर कुटे (२०१९), जयदीप विघ्ने (२०२०), हरिश्चंद्र पाटील (२०२१), कालिदास शिंदे / बाबुराव इंगळे (२०२२) या लेखकांना सन्मानित करण्यात आले आहे.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता – सोमनाथ मधुकर टकले, मु,पो,वडशिवणे ,ता, करमाळा ,जि, सोलापूर, पिन ४१३२२३. अधिक माहितीसाठी संपर्क – ९६९९७६०८०२

Related posts

संस्काराच्या कमाईवरच यशाची कमाई…

नव्या अक्षरांचे आगमन…

महागाईचा भस्मासुर

Leave a Comment