पावसात निथळणारा कोकण म्हणजे डोळ्यांना लुभावणारा स्वर्ग, कोकणातील घाट रस्ते, नारळी- पोफळीच्या बागा, कौलारू घरे अन् पावसात भिजलेला समुद्र किनारा..या सगळ्याचं अनुभव वंदनीय परशुरामाची भूमी आणि कोकणचं महाबळेश्वर असलेले दापोली डी सुभाष प्रोडक्शनच्या सौजन्याने ड्रोनच्या नजरेतून…
कोकणातील दापोलीचा समुद्र किनारा सदैव आनंदाची उधळण करतो. हर्णै बंदर, कड्यावरील गणपती, आंजर्ले खाडी, बुरोंडी येथील भगवान परशुराम यांचा पुतळा, कर्डे किनारा, फत्तेदुर्ग आणि कनकदुर्ग किल्ला, गोगड किल्ला, सुवर्णदुर्ग किल्ला असे विविधतेने नटलेला दापोली परिसर पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. हे सर्व ड्रोनच्या नजरेतून…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.