December 7, 2023
onion-nutrient-management-article-by-dr-vinayak-shinde-patil
Home » 🧅 कांदा – अन्नद्रव्ये व्यवस्थापन 🧅
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

🧅 कांदा – अन्नद्रव्ये व्यवस्थापन 🧅

🧅 कांदा – अन्नद्रव्ये व्यवस्थापन 🧅

अपेक्षित उत्पादन येण्यास कांदा पिकासाठी प्रति एकरी 8 ते 10 टन चांगले कुजलेले शेणखत वापरावे. शेणखत पसरवून नांगरट करून मातीमध्ये मिश्रित करावे. शेणखत अर्धवट कुजलेले असेल तर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. शेणखत, हिरवळीचे खत आणि इतर पिकांची फेरपालट व्यवस्थित होत असेल तर सूक्ष्मद्रव्ये सुद्धा पिकांना उपलब्ध होतात.

👉🏻 कांदा रोप लागवडीनंतर दोन महिन्यांपर्यंतच नत्राची गरज जास्त असते. कांदा पूर्ण वाढल्यानंतर नत्राची आवश्‍यकता नसते.
👉🏻 मुळांच्या वाढीकरिता स्फुरदाची आवश्‍यकता असते. स्फुरद जमिनीत तीन ते चार इंच खोलीवर रोपांच्या लागवडी अगोदर द्यावे म्हणजे नवीन मूळ तयार होईपर्यंत स्फुरद उपलब्ध होते.
👉🏻 पालाश झाडांच्या पेशीमध्ये इतर मूलद्रव्यांच्या वाहतुकीसाठी आवश्‍यक असते. पेशींना काटकपणे देते व पिकांची रोगाविषयी प्रतिकारक शक्ती वाढवते. स्फुरदाबरोबर पालाशची पूर्ण मात्रा लागवडीअगोदर दिली जाते.
👉🏻 कांद्यासाठी गंधकयुक्त खतांची गरज भासते. गंधकामुळे कांद्याची साठवणक्षमता वाढते. कांदा पिकास सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश आणि अमोनिअम सल्फेट किंवा युरिया याद्वारे खते दिली तर गंधक वेगळा वापरण्याची गरज नाही. पाण्यात विरघळणारी गंधक पावडर दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी व स्टिकर यासोबत मिसळून फवारणे फायदेशीर ठरते. माती परीक्षणानुसार प्रति एकरी 20 किलो ग्रॅम गंधकयुक्त खते जमिनीत मिसळून द्यावीत.
👉🏻 कांदा पिकासाठी खतांच्या मात्रा किती द्यावयाच्या हे जमिनीचा प्रकार, लागवडीचे हंगाम, वापरली जाणारी आणि खत देण्याच्या पद्धती यावर अवलंबून असते.
👉🏻 सर्वसाधारणपणे 60 किलो नत्र, 20 किलो स्फुरद, 30 किलो पालाश आणि 20 किलो ग्रॅम गंधकयुक्त खते द्यावीत.
👉🏻 रासायनिक खतापैकी 1/3 भाग नत्र, संपूर्ण स्फुरद, पालाश व गंधक लागवडीच्या वेळी आणि राहिलेले नत्र दोन हप्त्यांत विभागून द्यावे. नत्राचा पहिला हप्ता लागवडीनंतर 30 दिवसांनी आणि दुसरा त्यानंतर 15 ते 20 दिवसांनी द्यावा.
👉🏻 कांदा पिकास नत्रयुक्त खत शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा जास्त व लागवडीच्या 60 दिवसांनंतर दिल्यास डेंगळे येणे, जोड कांदा येणे, कांदा साठवणक्षमता कमी होते.
👉🏻 पुनर्लागवडीला दोन महिने झाल्यानंतर 3 ग्रॕम 00:52:34 प्रति लिटर पाण्यात घेवून फवारणी करावी. त्यानंतर अवश्यकता असल्यास 2-3 ग्रॕम 00:00:50 प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.
👉🏻 कांदा काढणी अगोदर 10-15 दिवस 0.1% बाविस्टीनचा स्प्रे घेतल्यास कांद्याची साठवण क्षमता वाढते.

Related posts

कृपावंत : एक प्रबोधनात्मक पुस्तक

आद्य मुंबई अन् नाना शंकरशेट 

लखलखत्या दिवाळीत शेतकऱ्याच्या घरात अंधारच

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More