March 29, 2024
pandharichi-wari-poem-by-jagannath-kharate
Home » पंढरीची वारी…
कविता

पंढरीची वारी…

दैवशयनी एकादशी निमित्त….ठाणे येथील जगन्नाथ खराटे यांची पंढरीची वारी ही कविता…

पंढरीची वारी । सवे वारकरी ।
नाचताती सारी। विठुसवे।।

भक्तांची ती दाटी। सवे उठाउठी ।
प्रेमानंदे ओठी। पांडुरंग।।

टाळचिपळ्यांचा। गजर होतसे।
प्रेमांनंदे हर्षे ।नाचताती । ।

विठ्ठल विठ्ठल । मनात कोंडला।
अहंकार गेला। देशांतरा।।

दाटे मनी पुर । चंद्रभागेतिर।
सुख ते अपार। नामघोषे।।

विठ्ठल विठ्ठल । रुखमाई वर।
हर्ष ते अपार । पंढरीची।।

देह तो पंढरी । विठ्ठलाचे घर।
नांदे निरंतर । भक्तांची ।।

जन्मोजन्मी वारी।सदा ती घडावी।
आंस ती जीवी। विठ्ठलाची ।।

अखंडीत वारी। ज्ञाना,तुकयाची।
संत नामयाची। वाळवंटी ।।

Related posts

कोरोना संकट

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे पुरस्कार जाहीर

ऊठ, जागा हो अन्… ( एकतरी ओवी अनुभवावी )

Leave a Comment