पापणी सानुल्या तुझ्या स्वप्नील नयनी पदर होतसे अवखळ पापणी मम अंतरी जरा पहा डोकावूनी सखे कधी होशील माझी राणी ? लकाकणारे डोळे चित्तचोर भोळे संवाद साधणारे आहेत निराळे एक नेत्रकटाक्ष दे उचलून पापणी सखे कधी होशील माझी राणी ? अजूनही दिसते बाहुली खेळातली अनमोल ठेवा त्या दिव्य स्वर्गातली नभांगणातील तारका मनमोहिनी सखे कधी होशील माझी राणी ? येतील क्षण सुखाचे उभय जीवनी आता गाऊ नको दुःखद विरहणी ये हसत पुसून टाक जुनी कहाणी सखे कधी होशील माझी राणी ? विलास कुलकर्णी

Home » पापणी
previous post
next post