December 7, 2022
Yelkot Poem by Arvind Dhavalikar
Home » येळकोट
कविता

येळकोट

येळकोट   

कडे पठारी मूळ स्थान ये 
भक्तांसाठी गडावरी 
म्हाळसापती दैवत माझे 
गड सोन्याचा जेजुरी 

अवतरले शिव शंकर जगती 
सवे म्हाळसा बने पार्वती 
मणि मल्लांचा नाश करविता 
बनले हो मल्हारी...... 

सोमवती अन चैत्र पौर्णिमा 
उत्सव दसरा माघ पौर्णिमा 
चंपा षष्ठी भक्त दाटती 
जणु दुसरी पंढरी...... 

अनेक स्थाने अनेक रूपे 
खंडेराया तुझी स्वरूपे 
देवी म्हाळसा सखी बाणाई 
शोभतसे मंदिरी..... 

कुल दैवत तू लक्ष जीवांचे 
खुले भाग्य दर्शनी तयांचे 
जागर, गोंधळ, तळी भरुनीया 
भंडारा अंबरी..... 

मल्हारी मार्तंड पूजिती 
वाघ्या मुरळी भान हरपती 
येळकोट येळकोट शब्द पोचतो 
कैलासा शिखरी..... 
म्हाळसापती दैवत माझे हा 
गड सोन्याचा जेजुरी ll

अरविंद ढवळीकर ( 9960267354)

Related posts

विसरू नको बापाला…

चंद्राची आरती…

आनंदभान (अभंगसंग्रह ) : एक सामाजिक जाणिवेचा अमृत कुंभ

Leave a Comment