May 30, 2024
Pushpa Varkhedkar article on Goutam Buddha
Home » प्रज्ञावंत तथागत गौतम बुद्ध
मुक्त संवाद

प्रज्ञावंत तथागत गौतम बुद्ध

भावनामुळे प्रज्ञेचा विकास झाल्यास अस्तित्वाचे सत्य स्वरूप पाहण्यास आपण सिद्ध होतो. या भावनामय प्रज्ञेमुळे बुद्धत्व प्राप्त होते.

पुष्पा सुनिलराव वरखेडकर
माजी पर्यवेक्षिका पी डी कंन्या शाळा वरूड

कौशल देशातील लुंबिनी नावाच्या शहरात( नेपाळ) इ.स. ५६३पूर्व मध्ये गौतम बुद्धाचा जन्म झाला.आईचे नाव महामाया देवी, वडिलांचे नाव शुद्धोधन राजा. गौतम बुद्धाच्या जन्मानंतर सात दिवसात महामाया देवीचे निधन झाले. पुढील संगोपनाची जबाबदारी मावशीने घेतली. दुसऱ्या पत्नीचे नाव महा प्रजापती गौतमी होते. सुखवस्तु राज घराण्यात गौतम बुद्धाचा जन्म झाला व तत्कालीन परिस्थितीनुसार त्यांचे एक महान अभ्यासक ज्योतिष्यकारांनी भविष्य वर्तविले की एक तर हा महान सम्राट होइल अन्यथा महान संत. परंतु राजा शुद्धोधनाला ते अमान्य होते.

राज्यांमधील सर्व दुःखापासून मुक्ती व्हावी म्हणून सर्व सुख समृद्धी व सुखसोयींनी युक्त अश्या सर्व गोष्टींची निर्मिती राजगृहात व परिसरात केली. अचानक एक दिवस गौतम आपल्या राज्यात फेरफटका मारण्याची इच्छा झाली. व आपल्या सारथी सोबत राज्यातून फेरफटका मारण्याकरिता गौतम बुद्ध राज्यांत विहार करतात. त्यांना तीन दृश्यं दृष्टोत्पत्तीस येतात. एक महारोगी हाताची बोटे गळून शरीरावर विद्रुप्ता आलेला दिसतास.

गौतम बुद्धाने आपल्या सारथीला विचारना करता सारथी उत्तर देतो की,’ जगामध्ये मनुष्य जीवन जगत असताना रोगाचा सामना करावा लागतो.’ नंतर त्याला वयोवृद्ध म्हातारपणाने जर्जर झालेला दिसतो व शेवटी एक प्रेत यात्रा दिसते तेव्हा जन्मानंतर आयुष्याच्या शेवटी प्रत्येकाला जग सोडून जावे लागते. ही सर्व दुःखे पाहून गौतम बुद्ध व्यथित होतात व मोहमायेचा त्याग करून सत्याचा शोध घेण्यात एक दिवस घराबाहेर पडतात. संपूर्ण जग हे अज्ञानामध्ये जीवन जगत आहे. व त्यामुळे मनुष्याला दुःखाचे अस्तित्व व दुःख निरोधनाचा उपाय ही उदात्त सत्ते समजले नाहीत.

प्रत्येक माणूस आपापल्या बुद्धीप्रमाणे त्याला जसे समजते त्यानुसार सत्याची कल्पना करून जीवन जगत आहे. बुद्धाने अशा अवस्थेला अंधार कोठडीची उपमा दिलेली आहे. प्रज्ञेचा अभावामुळे घडत आहे. गौतम बुद्ध प्रज्ञावंत होते त्यांनी सतत सहा वर्षे खडतर तपश्चर्या केली. नव्या प्रकाशाचा शोध घेण्यासाठी गौतमाने चार आठवडे ध्यान मग्न राहून चार पायऱ्यांनी प्रज्ञा प्राप्त केली.

प्रज्ञाप्राप्ती गौतमाला ध्यान साधनेच्या समाधीच्या परिणामकारक सरावातून झाली. मी त्या मिथ्या दृष्टी आणि गैरसमजातून त्यांनी स्वतःची मुक्तता करून घेतली. बुद्ध धर्माच्या प्रज्ञाप्राप्तीचे शिकवणीनुसार आचरण करीत प्रज्ञेचा विकास होतो. प्रज्ञेच्या तीन पातळ्यातून विकास पावत जातो. श्रुतमय प्रज्ञा, चिंतन्मय प्रज्ञा व भावनामय प्रज्ञा म्हणजे. बोलणे, ऐकणे, सहन करणे म्हणजे श्रुतमय प्रज्ञा होय.यालाच वाचन व ग्रहणशील म्हटले जाते. मनाचा एक कप्पा तो सतत रिकामा ठेवून ज्याने ज्याने जे जे सांगितले त्यातील योग्य असे आत मध्ये झिरपवीत असतो. कुशलांचा संचय होऊन दुःख दूर होते. व आनंदाचा वर्षाव व्हायला लागतो.

नंबर दोन चिंतनमय प्रज्ञेने पाहिलेले आत्मसात करणे यालाच चिंतन्मय प्रज्ञा म्हणतात. विचार मंथनातून आपण स्वतः निष्कर्ष काढले पाहिजे जे काही वाचतो किंवा शिकतो त्याचा आंधळेपणाने स्वीकार करता कामा नये. ही प्रज्ञा नसल्यामुळे माणूस नुसता चिंता करीत बसतो. चिंतन्मय प्रज्ञामुळे माणूस सतत कुशल विचार आणून त्यानुसार कार्य करीत असतो. म्हणून येणारा भविष्यकाळ जर आलाच तर तो सुख घेऊन येतो. त्याला आनंद सुख शांति आणि समाधानाचा लाभ घेऊन येतो.

नंबर तीन भावनामय प्रज्ञेचा अर्थ मनाचा विकास, जागृतीचा विकास असा होतो. ध्यानाच्या किंवा समाधीच्या अनुभवातून मनाचा विकास किंवा जागृतीचा विकास साधला जातो. ही प्रज्ञा नसल्यामुळे मनात राग, लोभ किंवा मोहाचे विचार वाढतात.

भावनामुळे प्रज्ञेचा विकास झाल्यास अस्तित्वाचे सत्य स्वरूप पाहण्यास आपण सिद्ध होतो. या भावनामय प्रज्ञेमुळे बुद्धत्व प्राप्त होते. या सोबत शिलाची देखील आवश्यकता आहे. व करुनेची देखील आवश्यकता आहे. शीला शिवाय व भावनेअभावी सर्व भयकारक ठरते, असे डॉ. बाबासाहे आंबेडकर म्हणतात. यावरून प्रज्ञावंत गौतम बुद्धाची शिकवण अखिल विश्वातील मानवाला सुख प्राप्त करून देण्यासाठी किती उपयुक्त आहे याची कल्पना येते.

समाजातील दुःख व अज्ञान दूर करण्यासाठी बुद्धाचे पंचशील मार्गदर्शक ठरतात. आजच्या दिनी त्यांच्या अमृतवाणीचे रसपान करून आपले दुःख व ज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करूया व त्यांच्या मौलिक उपदेश व मार्गदर्शक तत्त्वांना शतशः वंदन करूया.

Related posts

प्रशासक जिजाऊ अन् आज्ञापत्र

चितकुल उत्तर भारतातील शेवटचे गाव…

मुलांच्या अभ्यासाची चिंता सतावतेय …मग हा करा उपाय

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406