October 4, 2023
viral-jokes-rajan-konvadekar-phulbaja
Home » आम्ही सारे प्रविण…
व्हायरल

आम्ही सारे प्रविण…

आम्ही सारे प्रविण....

आला कुठून गेला कुठे
मतदारांना नवीन आहे | 
खुर्चीसाठी पक्ष बदलण्यात
खरचं गडी प्रविन आहे ||
संदर्भ…भाजप विरुद्ध जाणाऱ्या ना ईडी अटळ--

 अगतिक हालचाली…..

 सत्तारुढ आंधळ्याना
सूडाग्निची झळ आहे |
 विरोधात जाणाऱ्यांणा
ईडी नोटीस अटळ आहे |
संदर्भ- अमेरिकेत लोकशाहीचे वस्त्रहरण… कॅपिटलवर ट्रंप समर्थकांचा हल्ला….

ट्रंपायण.....     
 
दिसावं तसं नसावं
पण कांहीं तरी असावं |
 लोकशाही मोडावी कशी
हे ट्रंप कडून शिकावं ||

विकृतीशी संग केला
कुठलीच कृती गोड नाही |
 लोकशाही मोडणाऱ्या
ट्रंपना जगात तोड नाही ‌||
      
पराभवाकडे नेणारं
हे कसलं इलेक्शन म्हणतो |
लोकशाहीवर रेप करणं
पराक्रमाचं लक्षण म्हणतो 
      
लोकशाहीच्या वस्त्रहरणाचा
जगाला किळस आहे‌ |
ट्रंपसाहेबांच्या लाचारीचा
सर्वात मोठा कळस आहे |
म्हातारा उपवर !

 उत्ताणा पडला मल्ल म्हणतो
 अजून नाक वर आहे |
 गळ्यात गुडघे आले तरी
 म्हातारा म्हणतो उपवर आहे ||
       
राजन कोनवडेकर

Related posts

भिंतीवरचे घड्याळ कशाने बंद पडले ?

 नफरत छोडो… भारत जोडो

घरातला पिज्जा

Leave a Comment