July 27, 2024
Renu Dandekar Comment on Podcasting Book
Home » लिखित आशयाचं काय करायचं ? उत्तर हवंय. मग वाचाच..पॉडकास्टिंग
मुक्त संवाद

लिखित आशयाचं काय करायचं ? उत्तर हवंय. मग वाचाच..पॉडकास्टिंग

पॉडकास्टिंगचे भाषांतर करायच्या फंदात तो पडत नाही. पण आपण कामात आहोत, हात काम करतायेत, एका अर्थाने मेंदुला तसे काम नाही किंवा ताण आलाय, काही तरी छान, मनभावक ऐकायचं, मनाला उभारी देणारे ऐकायचे, तर काय करता येईल याचं उत्तर, हे पुस्तक देते.

रेणु दांडेकर

नव नवं तंत्रज्ञान येतंय. एका अर्थानं माणसे जोडली जाणे सोपं होतंय. एक पिढी या तंत्रज्ञानात रोज नवी क्षितिजे शोधतेय. एक पिढी या तंत्रज्ञानावर नाराज आहे. मनात पटणारं नाही, असे म्हणतेय, या तंत्रज्ञानावर टीका करतेय. तरी वेळ घालवण्यासाठी तंत्रज्ञान वापरतेय. हि भुमिका अशासाठी की तंत्रज्ञानाचे फायदे काय, नेमका उपयोग काय, हे समाजात मांडणी होण्याआधी तंत्रज्ञान येऊन आदळलं. हा काहीसा भाग, तंत्रज्ञानाबद्दल उदासिनता असण्याचा, जुन्या पिढीचा असेल. पण जेव्हा योग्यता ,उपयोग आणि फायदे नीटपणे मांडले जातात, तेव्हा उदासीनता कमी होते. हेच काम पॉडकास्टिंग ह्या पुस्तकाने केलय. फेसबुक, व्हाट्सअँप, यूट्यूब आदींसाठी आपण मोबाईल वापरतो, पण त्याचे कारण बरेच वेळा याचा नाद लागतो हे असते. आपोआप पडदा पुढे जातो आणि आपण राहत रहातो.

जाणीवपुर्वक, विशिष्ट विचाराने हे तंत्रज्ञान वापरता कसे येईल हे कुणीतरी सांगायला हवे, ते काम नचिकेतने केले आहे. पॉडकास्टिंगचे भाषांतर करायच्या फंदात तो पडत नाही. पण आपण कामात आहोत, हात काम करतायेत, एका अर्थाने मेंदुला तसे काम नाही किंवा ताण आलाय, काही तरी छान, मनभावक ऐकायचं, मनाला उभारी देणारे ऐकायचे, तर काय करता येईल याचं उत्तर, हे पुस्तक देते.

नचिकतेला मी भेटले, एका विषयसंबंधी लिहिलेला गठ्ठा त्याच्या हातात दिला. तो “आपण हे करुया” म्हणाला पण त्याने जे सांगितले त्याकडे मी फार लक्ष दिले नाही म्हणुन मला ते समजलं नाही. ते तसंच राहून गेलं. मी पुस्तकांची मागणी केली, त्यानेही लगेच पुस्तके पाठवली, मी ही तेवढ्याच तत्परतेने पुस्तके वाचली. एक आहे पॉडकास्टिंग. हे पुस्तक मी वाचलं आणि वाचतच गेले. इतकं सोपं, सहज, माझ्यासारखीलाही समजलं, असे लिहिलय. माझ्यासारखीला म्हणण्याचं कारण असे कि मी या तंत्रज्ञानापासून पलायन करणारी आहे. या पुस्तकानं मला ओढुन आणलं. अरे वा ! इतकं छान आहे का हे ! असंही मी मनास म्हणाले. नचिकतेला सांगावस वाटलं तू जिकलास. खूप उपयोगी पडेल हे पुस्तक. त्यातही पुस्तक मराठीत आहे.

रचना वेगळी आहे. हे पुस्तक दोघांनी लिहिलय. उज्वला बर्वे आणि नचिकेत क्षिरे यांनी. पुस्तकात त्याच्याबद्दल कुणीतरी तिसरं बोलतेय. म्हणजे उज्ज्वलाताईंना असं वाटत की, नचिकेत असं म्हणतो.. मी – आम्ही अशी रचना असते. ते – त्यांनी अशी रचना असते. पण तू, तुम्ही अशी रचना नसते. ती इथे बघायला मिळाली. छानच वाटलं. हा ही नवा प्रयोग म्हणायला हवा. शिवाय कुमार केतकरांची प्रस्तावनाही तेवढीच महत्वाची ठरते. एरवी तंत्रज्ञानाचा उपयोग माहिती मिळवणे, ज्ञान मिळवणे हा असला तरी, तो साध्य होतोच, असे नाही. काहीही, कुणीही, केव्हाही, कुठेही पहात असत. पाहणं लक्षात राहते असे नाही. विसरतं. वेळ निसटतो. पॉडकास्टिंगचा जगातला प्रसार जसा या पुस्तकात मांडलाय, तसा मायमराठीत तो कसा झालाय, किती झालाय, कुणी कुणी केलाय, विषय कोणते आलेत, या दोघांचा सहभाग किती, हे हि पुस्तकात आलंय..

पुस्तक वाचायला घेतलं तेव्हा मला वाटलं या विषयावरची ऐवढी पानं कशी वाचायची ? काय समजणार आपल्याला ? पण वाचता वाचता पुस्तक वाचुन झालं नि मनात राहिलंय. आता नव्या दृष्टीने मी बघु लागलेय. आपल्या लिखित आशयाचं काय करायचंय? याच उत्तर मला मिळालय. अनेक जण हि नवी रचना वापरतात पण ती कशी करायची? कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत..(आवाज, आशय, मांडणी, वेळ, आवाजातले चढउतार, पोत इ .) हे हि सुंदर पद्धतीने मांडलय.

पुस्तक – पॉडकास्टिंग – डिजिटल आवाजाची दुनिया!
लेखक – उज्ज्वला बर्वे, नचिकेत क्षिरे
प्रकाशन – नीम ट्री पब्लिशिंग हाऊस
किंमत 250 ₹
पुस्तकासाठी संपर्क – 95798 24817 Swara Books


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख

खांडेकरांनी साहित्‍यातून समाजाला मूल्‍यविचार दिला – गोविंद काजरेकर

अस्वस्थ मनांचा हुंकार-हंबर

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading