‘ श्रीशब्द ‘पुरस्कार जाहीर
नेज (ता. हातकणंगले, कोल्हापूर) येथील कै. सत्यभामा भगवंत पोतदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कवितासंग्रहसाठी दिले जाणारे ‘श्रीशब्द ‘ काव्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. स्फूर्ती साहित्य संघाचे अध्यक्ष चंद्रकांत पोतदार यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. गेली काही वर्षे थाबलेली ही साहित्य पुरस्कार चळवळ पुन्हा कार्यरत राहणार असून गेल्या तीन वर्षाचे पुरस्कार विजेत्यांची नावे यावेळी जाहीर करण्यात आली. यावर्षी कोरोनामुळे पुरस्कार समारंभ रद्द करणेत आला असला तरी विजेत्याना रोख रक्कम, सन्मानपत्र पाठवण्यात येणार आहे.
पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे:
२०१८:
१. तलखली: माया पंडित, कोल्हापूर
२. माझ्यातला कवी मरत चाललाय: इरफान शेख,गजबार्ड चंद्रपूर
२०१९:
१. माझ्या हयातीचा दाखला: विशाल इंगोले: लोणार सरोवर
२. शेनाला गेलेल्या पोरी: चंद्रशेखर कांबळे, राधानगरी
२०२०:
१. या परावलंबी दिवसात: बालाजी मदन इंगळे, जळगाव
२. कैवार: शिवाजीराव शिंदे, सोलापूर
विशेष पुरस्कार:सन्मानपत्र
१. सईच्या कविता: संदीप काळे, पाथर्डी
२. मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं: हबीब भंडारे, औरंगाबाद
कवी सुभाष पाटील यांच्या अध्यक्षतेतील समितीने हे पुरस्कार निवडले गेले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.