बालपणी ज्ञानाचे डोस, घेतलो इथे
त्यागातून गुरुंनी घडवले आम्हा इथे
ना मोबाईल होता, ना टीव्ही इथे
मनोरंजनापासून गुरुंनी दुर सारत
करिअरची स्वप्न दाखवली इथे
ते ज्ञानमंदिर आज आठवा इथे
गारगोटी (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) येथील मौनी विद्यापीठाच्या आवारातील श्री शाहू कुमार भवन मंदिराच्या दहावीच्या १९८६ च्या बॅचच्या माजी विद्यार्थी-विद्यार्थीनींचा स्नेहमेळावा आयोजित केला आहे. ज्ञानाचे धडे गिरवण्यास शिकवणाऱ्या गुरुंच्या उपस्थितीत २५ डिसेंबरला हा स्नेह मेळावा सकाळी नऊ वाजता शाळेतच होत आहे.
दहावीच्या अ, ब, क, ड व मुलींची इ अशा पाच तुकड्या होत्या. यातील सुमारे १७१ माजी विद्यार्थी विद्यार्थींनी या मेळाव्यात सहभागी होत आहेत. यातील काहीजण परदेशात तर काहीजण महाराष्ट्राबाहेर आहेत. काही उच्च पदावरही कार्यरत आहेत. जे संपर्कात आले त्यांनी सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत. अद्याप कोणाशी संपर्क होऊ शकला नसेल तर त्यांनी हेच निमंत्रण समजून मेळाव्यास उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन श्री शाहु कमार भवनच्या माजी विद्यार्थी-विद्यार्थींनीच्यावतीने करण्यात येत आहे.
या मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या १९८६ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी जितेंद्र कासार ९४२११०६६१०, राजेंद्र घोरपडे ९०११०८७४०६ यांच्याशी संपर्क साधावा.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.