🌹🌹🌹 श्वास 🌹🌹🌹 श्वास धनवान श्वास बलवान आसमंतात दरवळणारा सुगंध तो गुणवान घेत जावे कधी सोडावे भावनांना दरवळ यावे क्षण हासरे क्षण बोचरे अनुभवाचे संगीत गावे धडधडणाऱ्या हृदयालाही असावे क्षणाचे भान... मंद झुळूक तपल्या झाका बदल जगाचे शांत डोका गुदमरताना आल्हाददायक विचार सारखे घेते झोका घोर सरावे सौख्य भरावे विसरून सारे ताण... माझे माझे परके कोणी जन्म मरण लागू दोन्ही वक्ष भरुनी फुगवीत बसता वाया जाईल मानव योनी मनमंदिराच्या गाभाऱ्यातून घुमु दे शाश्वत भान... पिकेल एकदा पान हिरवे पाय भूमीवर नभात मिरवे आदीपासून अंत गाठता बिंदू बिंदूत हवे गारवे वात काजळी आव्हान तरी उजडावे प्रकाशमान... 🙏लक्ष्मण खोब्रागडे🙏 जुनासुर्ला , ता. मूल , जि. चंद्रपूर ९८३४९०३५५१

Home » श्वास…
previous post
next post