June 6, 2023
Umesh Laxman Parvar Poem Dukhala awar ghal mansa
Home » दु:खाला आवर घाल माणसा…
कविता

दु:खाला आवर घाल माणसा…

दु:खाला आवर घाल माणसा
नशीब माणसाला वैभव आहे
सुख हे आंधळे प्रेमासारखे
जीवन ओकर ती स्पष्ट आहे

दोन्ही जीवाला घाव देते
आसरेची आस मनी असून
आटले रे अनुभव मानवतेचे
दूर तू जाता हदय गेले तुटून

भाव मनाचे कळले नाही
जीव गुंतता एकमेकांशी
हरून गेलो कसे ? हे जीवन
तुटले बंधन सुख अपुले

जगी दोन्ही मनाची कहाणी 
कळली नाही अजूनही कुणाला ? 
आसंवाची कळा सोसता 
आसंवे ही येती डोळयामधून 

मी अर्थ बदल करून गेलो
वळणावर ती घटका घटका
वाट पाहूनी सुखाची नी सुखाची
आसंवाना थांबवू न शकलो

उमेश लक्ष्मण परवार, गोवा
मो. ९६३७१६४१८९

Related posts

जागवा रे जागवा…

लोकगीत – भेट

प्रेम चिरंतन…

Leave a Comment