पुणे – शिवांजली साहित्यपीठ व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाळकवाडी- पिंपळवंडी – जुन्नर यांचे तर्फे २७, २८ फेब्रुवारी व १, २ मार्च २०२५ रोजी ३२ व्या राज्यस्तरीय शिवांजली मराठी साहित्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. पद्मविभूषण उद्योगपती रतन टाटा सभा मंडप शिवांजली शैक्षणिक संकुलात होणाऱ्या या कार्यक्रमात विविध साहित्य पुरस्कारांचे वितरण होणार आहे, अशी माहिती शिवाजी चाळक यांनी दिली आहे.
नंदकुमार पाडेकर पुरस्कृत ‘विठाई स्मृती’ शिवांजली साहित्य सन्मान (कथा) साहित्य सन्मानासाठी अनंता सुर यांच्या कोंडमारा या कथासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम ३००० रु. असे या शिवाजंली साहित्य सन्मानाचे स्वरुप आहे. १ मार्च रोजी सकाळी साडे नऊ वाजता होणाऱ्या कार्यक्रमामध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
यावेळी देण्यात येणारे अन्य पुरस्कार असे –
प्रौढ साहित्य सन्मानार्थी
शिवांजली साहित्य सेवा सन्मान – २०२५ (संस्था)
- अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे
- शब्दगंध कवी मंडळ, बेळगाव
- नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ, चिंचवड.
सौ. मोनिका अण्णासाहेब मटाले पुरस्कृत- स्व. बबनराव मटाले स्मृती शिवांजली साहित्य सन्मान (कथा) विभागून
गाव विकणे आहे- डॉ. राज यावलीकर, अमरावती
पळस फुलला – मोहन ज्ञानदेवराव काळे, अकोला
श्री. द. स. काकडे पुरस्कृत शिवांजली साहित्य सन्मान (कादंबरी)
सावड – चंद्रकांत महादेव गावस, गोवा
श्री. रो. मा. लांडगे पुरस्कृत – सावित्री – मारूती स्मृती शिवांजली साहित्य सन्मान (कादंबरी)
ठिगळ – प्रा. डॉ. मीना वसंतराव सुर्वे, सांगली
अॅड. महेश गोसावी पुरस्कृत शिवांजली साहित्य सन्मान (कादंबरी) विभागून
डी. पी. होता म्हणून – नितीन गणपत शिंदे, पुणे
कीड – विशाल मोहड, अमरावती
प्रा. डॉ. जयसिंग गाडेकर पुरस्कृत- होनाजी गाडेकर स्मृती शिवांजली साहित्य सन्मान (ललित)
कोलाज – मुग्धा शेखर, गोवा
प्रा. डॉ. गणेश सोनवणे पुरस्कृत – केशव भोजने स्मृती शिवांजली साहित्य सन्मान (ललित) विभागून
कपाळ गोंदण – निशा डांगे, यवतमाळ
किनारे सावल्यांचा- अॅड. शुभदा कुलकर्णी, सातारा
कै.शहाजी ढेकणे स्नेहीजन पुरस्कृत – शहाजी ढेकणे स्मृती शिवांजली साहित्य सन्मान ( शिक्षण साहित्य)
घडणारी शाळा – भाऊसाहेब कासार, अहिल्यानगर
डॉ. लक्ष्मण इंगळे पुरस्कृत शिवांजली साहित्य सन्मान (आत्मकथन) विभागून
जागरण – भारत सातपुते, लातूर
पालमूळ – नानासाहेब खर्डे, अहिल्यानगर
दत्ता वाघ पुरस्कृत – गीताई – सखा स्मृती शिवांजली साहित्य सन्मान (प्रौढ नाट्य )
जोहार मायबाप – डॉ. विजयकुमार देशमुख, मुंबई
प्रा.डॉ. केशव बोरकर पुरस्कृत – आत्माराम शास्त्री बोरकर स्मृती शिवांजली साहित्य सन्मान (आत्मकथन) विभागून
स्वादूपिंडाची शस्त्रक्रिया आणि मी अर्थात- मृत्यूंजय सुनिल देसाई, कोल्हापूर
ब्युटी ऑफ लाईफ – आशा नेगी – हिरेमठ
दीपज्योत फौंडेशन पुरस्कृत – लक्ष्मी – बापू स्मृती शिवांजली साहित्य सन्मान (संपादन)
मिथक: साहित्य व संस्कृती- अशोक राणा संपादक – डॉ. संजीव कोंडेकर, डॉ. प्रशांत राऊत, नागपूर
श्री. राजू कडाळे पुरस्कृत- कै. पारू कडाळे स्मृती शिवांजली साहित्य सन्मान (प्रासंगिक) विभागून
वटवृक्षाच्या छायेखाली – काशिनाथ शिव, चंद्रपूर
पोलीस मन – अजित देशमुख, मुंबई
डॉ. भरत पाडेकर पुरस्कृत शिवांजली साहित्य सन्मान (संस्कार विचार)
समृद्ध पालकत्व – डॉ. अदिती काळमेख, सातारा
श्री. रघुनाथ काकडे पुरस्कृत – गिरीजानंद स्मृती शिवांजली साहित्य सन्मान ( काव्य )
घामाचे संदर्भ – किरण भावसार, नाशिक
श्री. संदीप वाघोले पुरस्कृत शिवांजली साहित्य सन्मान ( काव्य )
तुझं शहर हजारो मैलावर – सुनिता डागा, पुणे
श्री. शिवाजी चाळक पुरस्कृत- सीतासखा स्मृती शिवांजली साहित्य सन्मान ( काव्य )
माती मागते पेनकिलर- सागर जाधव जोपुळकर, नाशिक
श्री. दत्तात्रय वडगावकर पुरस्कृत- शिवांजली साहित्य सन्मान ( काव्य )
जामिनावर सुटलेला काळा घोडा – धनाजी धोंडीराम घोरपडे, सांगली
डॉ. प्रविण चाळक पुरस्कृत – सयाजी चाळक स्मृती शिवांजली साहित्य सन्मान ( काव्य ) विभागून
पाना तोडणीच्या मोसमात – मालती सेमले, गडचिरोली
पातीवरच्या बाया – सचिन शिंदे, उमरखेड
दीपक सुकाळे पुरस्कृत शिवांजली साहित्य सन्मान ( काव्य ) विभागून
सावलीची झळ – कल्पना पाटकर, मुंबई
एकांत रेघेवरून – सुनिती लिमये, पुणे
बालसाहित्य सन्मानार्थी
कोकणे फर्निचर परस्कृत – सुरेशशेठ कोकणे स्मृती शिवांजली साहित्य सन्मान (बालसाहित्य- कांदबरी)
१९६५ स्मार्ट रोबो ए आय आणि औरंगजेब- सुरेश वांदिले, मुंबई
डॉ. कैलास कापडे पुरस्कृत पंचफुलाबाई कापडे स्मृती – शिवांजली साहित्य सन्मान (बालसाहित्य – कथा )
कामधेनू – बबन शिंदे, हिंगोली
श्री. तबाजी भा. शिंदे पुरस्कृत – शिवांजली साहित्य सन्मान (बालसाहित्य – कथा) विभागून
गोष्टीतून कबीर – संजीवनी बोकील, पुणे
कळीची फजिती – रश्मी गुजराथी, पुणे
डॉ. प्रविण शांताराम डुंबरे पुरस्कृत सिंधुबाई शांताराम डुंबरे स्मृती – शिवांजली साहित्य सन्मान (बालसाहित्य- काव्य )
फडताळातली खेळणी- सतिश तिरोडकर, मुंबई
श्री. सागर अशोकशेठ लामखडे पुरस्कृत – अशोकशेठ शिवबा लामखडे स्मृती शिवांजली साहित्य सन्मान (बालसाहित्य- काव्य) विभागून
एकदा आपणच व्हावे मोर- मोहन काळे, नवी मुंबई
दिवा लावू या रे – स्वाती दाढे (सुखेशा), पुणे
श्री. जितेंद्र महादेव गुंजाळ पुरस्कृत तात्यासाहेब गुंजाळ स्मृती – शिवांजली साहित्य सन्मान (बालसाहित्य- एकांकिका)
नाट्य दरबार- किरण सरोदे, पुणे
उद्धव शहाणे पुरस्कृत शिव-सावित्री स्मृती शिवांजली कलाविष्कार सन्मान – २०२५
शांताराम बाम्हणे (निसर्ग छायाचित्रकार)
प्रदीप सुर्यवंशी (चित्रकार)
शिवांजली भूमिपुत्र – २०२५
प्रा. शरद मनसुख (कथाकार), निवृत्ती कोरडे (कवी),,प्रा. मीरा हाडवळे (कवयित्री), पांडुरंग घोलप (कवी, लेखक), रुपाली कर्डिले (कवयित्री, गझलकारा ), प्रा. डॉ. पौर्णिमा कोल्हे (कवयित्री, लेखिका), रतिलाल बाबेल (व्याख्याते, कवी ), प्रा. दिपिका जंगम (कथाकार, व्याख्यात्या), धर्मेंद्र कोरे (पत्रकार), विठ्ठल शितोळे (साहित्यिक), प्रा. मधुकर एरंडे (साहित्यिक)
शिवांजली नवोन्मेष भूमिपुत्र – २०२५
सौरभ नवले (कवी, कादंबरीकार ), श्रीदिप घोगरे (मराठी, इंग्रजी कादंबरीकार )
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.