पापणी
ओलावते कधी पापणी
तेंव्हाच मोहरते लेखणी
हे सुख की दुःख सांगते
शब्दांची निवड देखणी
होते कधी तरी भारवाही
अखंड वाहे अमृत वाहिनी
सुख असो की दुःख तिला
खारटच असते तरी पाणी
क्षणात उघडे क्षणात मिटते
होकारच घेतो मग समजुनी
अल्लड अवखळ पापणी
वेडीच ठरते खुळी दिवाणी
नयन उघडता गुज सांगते
धीट कधीतरी होते पापणी
सांगताना मध्ये अडखळते
साखरेची मग होते पेरणी
देवयानी तू यावी जीवनी
देवाकडे ही एकच मागणी
तिचेच नाम ओठावर घेवून
मिटेल अखेर माझी पापणी
कवी – विलास कुलकर्णी
मीरा रोड