September 27, 2023
Yashawant Hirabai trambak Pagare Poem Swapna Gulabi
Home » स्वप्न गुलाबी
कविता

स्वप्न गुलाबी

स्वप्न गुलाबी

मन अंथरले डोळ्यांमधे
वाट पहात आहे राणी
हळूहळू भरते घागर
पापणीतले गुलाब पाणी

जीवनाचा हिरवा शालू
कटकीची चोळी अंगी
जागेपणी का बघते आहे
स्वप्न उद्याचे सप्तरंगी

हाती मेहंदी अंतरातली
शब्द थांबले रंगीत ओठी
महापूर का येईल त्यांचा
होतील जेंव्हा भेटी गाठी

कमान जशी धनुष्याची
भिवयांना तू काय शिकविले
इष्काच्या मधात बुडवून
नजरेचे का बाण सजविले

केसांचे ते म्हणणे मजला
कळले सखे कळले राणी
घेऊन येतो ताजी गुलाबी
एकांताची अवखळ गाणी

कवी – यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे
बदलापूर

Related posts

मेघराजा का रे तू…

नोट

मी एक बाप आहे

Leave a Comment