February 5, 2025
WAVES 2025 - An initiative to empower Indias emerging talent in animation, film and gaming
Home » वेव्ह्ज (WAVES) 2025 – अ ॅनिमेशन, चित्रपट आणि गेमिंग क्षेत्रातील भारताच्या नवोदित  प्रतिभेला सक्षम करणारा उपक्रम
मनोरंजन

वेव्ह्ज (WAVES) 2025 – अ ॅनिमेशन, चित्रपट आणि गेमिंग क्षेत्रातील भारताच्या नवोदित  प्रतिभेला सक्षम करणारा उपक्रम

डान्सिंग अॅटम्स या संस्थेच्या वतीने मुंबईत दि. 1 फेब्रुवारी 2025 रोजी भविष्यातील कथात्मक मांडणीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अवलंब या विषयावर कार्यशाळा आयोजित केली गेली.  आयआयटी मुंबई येथील औद्योगिक संरचना केंद्राच्या (Industrial Design Centre -IDC) सभागृहात ही कार्यशाळा पार पडली. ही कार्यशाळा वेव्ह्स – क्रिएट इन इंडिया कॉम्पिटिशन – वेव्ह्स एएफसी मास्टरक्लासेस या उपक्रमाचा एक भाग होती.  भारतातील कथात्मक मांडणी क्षेत्रातील सर्जनशील कलाकारांच्या पुढच्या पिढीचे सक्षमीकरण करणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता.

या अंतर्गत कल्पनेपासून परिणाकारतेमांपर्यंत – उत्कृष्ट सादरीकरणाचा मास्टरक्लास (IDEA TO IMPACT – A Stellar Pitch Deck Masterclass) या विषयावर कार्यशाळेचे सत्र झाले. लेखिका-दिग्दर्शिका सरस्वती बुयाला यांनी या कार्यशाळेत मुख्य मार्गदर्शन केले. या सत्रात त्यांनी कार्यशाळेतील सहभागींना त्यांच्या सर्जनशील कल्पनांना परिणामकारक मांडणीमध्ये कसे परावर्तीत करावे याविषयी मार्गदर्शन केले. कथात्मक मांडणी विश्वात सातत्याने कशाप्रकारचे बदल होत आहेत याविषयी या कार्यशाळेत दीर्घ चर्चा झाली. याच बरोबरीने चित्रपटनिर्मिती, अॅनिमेशन आणि कथात्मक मांडणीच्या इतर माध्यमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे उदयोन्मुख तंत्रज्ञान कशा रितीने क्रांती घडवून आणेल ही बाबही या कार्यशाळेत अधोरेखीत केली गेली.

या कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी रंजक कथात्मक मांडणीसाठी कथानकाची रचनात्मक  मांडणी करणे, समाज भावना समजून घेणे आणि गुंतवणूकदार तसेच निर्मात्यांकरता सार स्वरुपातील परिणामकारक सादरीकरण तयार करणे असे अनेक पैलूंविषयी जाणाून घेतले.  लेखनाचा नियमीत सराव आणि प्रेक्षकांना भावतील अशा अर्थपूर्ण कथा तयार करण्याचे महत्त्व तसेच प्रेक्षकांशी जोडून घेताना सामाजिक  भावनांचे सामर्थ्य या मुद्यांवरही या सत्रात भर दिला गेला.

या कार्यशाळेत सर्जनशीलतेसोबतच भारतातील अॅनिमेशन क्षेत्राच्या सद्यस्थितीवरही चर्चा केली गेली. उदयोन्मुख चित्रपट दिग्दर्शकांना अधिकचे पाठबळ उपलब्ध होणे, , चित्रपट उद्योग आणि व्हिज्युअल इफेक्ट्सच्या विद्यार्थ्यांचे व्यापक एकात्मिकरण घडवून आणणे, तसेच भारतीय अॅनिमेटेड चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी अधिकाधिक मंच उपलब्ध करून देण्याची गरज या कार्यशाळेत अधोरेखित केली गेली. भारतातील अ ॅनिमेशन क्षेत्राच्या भवितव्याभोवती केंद्रित असलेल्या अनेक चर्चा या कार्यशाळात झाल्या. यात कृत्रिम बुद्धमत्तासारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञान कशारितीने निर्मिती प्रक्रिया सुरळीत करण्यात तसेच स्वतंत्रपणे चित्रपट निर्मितीमध्ये गुंतलेल्या कलाकारांचे सक्षमीकरण करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकते यांसारख्या मुद्यांवर भर दिला गेला. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्रतिनिधींना प्रयोगशीलता दाखवणे, मनोरंजन मूल्यांना प्राधान्य देणे आणि आपल्या कौशल्यांचा वापर करून प्रभावशाली कथानके तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले.

सरस्वती बुयाला यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी तसेच मनोरंजन उद्योग क्षेत्राचा अनुभव मिळवण्यासाठी ते या क्षेत्रासंबंधीची कौशल्ये शिकत असतानाच, त्यांनी परस्परांसोबत एकत्र काम करायला सुरुवात करावी, परस्परांना सहकार्य करावे आणि लघु मालिकांची निर्मिती करावी असे सल्लावजा आवाहनही केले.

या कार्यशाळेच्या समारोपावेळी जगाच्या कथा मांडण्यासाठी भारतीय कथा निर्माते घडवण्याचे आवाहन केले गेले. यासोबतच चित्रपट, अ ॅनिमेशन, व्हीएफएक्स, कॉमिक्स, गेम्स, एक्सआर आणि एआर यांसारख्या माध्यमांमधील कथात्मक मांडणीचे कौशल्य भारतातील प्रतिभावान व्यक्तीसांठी कशारितीने यशाचे दरवाजे खुले करू शकते ही बाबही या कार्यशाळेत अधोरेखित केली गेली.

खुल्या स्पर्धा आणि उपक्रमांबद्दल अधिक माहितीसाठी https://wavesindia.org/challenges-2025 या संकेतस्थळाला भेट द्या.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading