माय मराठी तुझ्या अमृते अनुभुती संपदा तुझ्या कुशीतून जन्मा येते ज्ञानाची लिनता... तुझे लेकरू घेण्या पाही कवेत भाषासरीता तुझ्या कृपेने शब्द मिळावे गीत ओवण्याकरीता... अवकाशाचे पंख जरासे शब्दांना लाभती माये तुझीया वाग्रसांची द्यावी मज अनुभुती..... माय मराठी तुझ्या कौतुके रचली कवने किती कुसुमाच्याही अग्रजबाळा दिलीस तू ती किर्ती.... कवयित्री - मानसी चिटणीस

Home » माय मराठी…