आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे
मोबाईल – 9423217495
विशाल शिर्के – भयंकर उकाडा कशामुळे ?
माणिकराव खुळे – पावसाळी हंगामात अरबी समुद्रावरून वाहणारे वारे पश्चिमी वाऱ्यांची दिशा बदलून वाऱ्यांचा वहन पॅटर्न ३ किमी. उंचीपर्यंत पूर्णपणे ९० अंशांत बदलून महाराष्ट्रावर वारे सध्या ते उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत आहे. शिवाय हंगामाप्रमाणे भाग बदलत प्रत्येक काही अंतरावर अपेक्षित असलेला हवेच्या दाबातील फरक सध्या नामशेष झाला आहे होवून केवळ एकसमान जाणवत असलेला १००६ मिलिबार ( हेक्टपासकल) इतका हवेचा दाब जाणवत आहे. वाऱ्याचा वेग मंदावला आहे. हवेला वहन नाही. हवेचे पार्सल एकजिनसी बंधित होवून उष्णतेचे संचयन त्यात घडून येत आहे. ह्याचाच अर्थ महाराष्ट्रावर प्रेशर ग्रेडीएन्ट -हवेच्या दाबाची चढ-उताराची क्रमिकता, किंवा – हवेच्या दाबाचा ढाळ किंवा चढ पूर्णपणे नामशेष झाली आहे. शिवाय ढगाळ वातावरणामुळे रात्रीची जमिनीतून बाहेर पडणाऱ्या उष्णतेला अटकाव होत आहे. ह्या परिणामातून सध्या भयंकर उष्णतेतुन महाराष्ट्रात उकाडा जाणवत आहे.
प्रश्न – जोरदार पावसाची शक्यता कोठे कोठे आहे ?
माणिकराव खुळे – विदर्भ वगळता, मुंबई कोकणसहित संपूर्ण महाराष्ट्रात रविवार ( दि. २५ ऑगस्ट ) पर्यन्त मध्यम पावसाचीच शक्यता जाणवते. मराठवाड्यात मात्र पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार २२ ऑगस्ट पर्यंतच मध्यम पावसाची शक्यता जाणवते. त्यानंतर तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. विदर्भातील ११ जिल्ह्यात मात्र आजपासूनच संपूर्ण आठवडा. म्हणजे रविवार (दि. २५ ऑगस्ट) पर्यन्त जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
प्रश्न – वाढलेले उन्हाचे तापमान कोठे कसे राहील ?
माणिकराव खुळे – संपूर्ण महाराष्ट्रात पुढील ३ दिवस म्हणजे मंगळवार ( दि. १९ ऑगस्ट) पर्यन्त दुपारचे ३ चे कमाल तापमान हे ३२ डिग्री से.ग्रेड च्या आसपास म्हणजे सरासरी कमाल तापमानापेक्षा ३ ते ६ डिग्री से.ग्रेड ने अधिक जाणवू शकते. विशेषतः संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव अश्या २१ जिल्ह्यात तर हे तापमान सरासरीपेक्षा ५ ते ६ डिग्रीने अधिक जाणवेल. उर्वरित मराठवाडा व संपूर्ण विदर्भातील १५ जिल्ह्यात हे तापमान २ ते ३ डिग्रीने अधिक जाणवेल. मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, नगर, पुणे, सातारा ह्या ८ जिल्ह्यात उन्हाची काहिली अधिक जाणवणार.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.