September 24, 2023
wheat export cross 872 million dolor range
Home » गहू निर्यातीने ओलांडला 872 दशलक्ष डॉलरचा टप्पा
काय चाललयं अवतीभवती

गहू निर्यातीने ओलांडला 872 दशलक्ष डॉलरचा टप्पा

एप्रिल-ऑक्टोबर (2021-22) या कालावधीत, भारताच्या गव्हाच्या निर्यातीने ओलांडला 872 दशलक्ष डॉलर मूल्याच्या निर्यातीचा टप्पा, एप्रिल-ऑक्टोबर (2020-21) मधील केवळ 135 दशलक्ष डॉलर्सवरून चालू आर्थिक वर्षात विक्रमी निर्यातीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी सज्ज

कोरोना महामारीमुळे जागतिक पुरवठ्यावर  झालेल्या परिणामांनंतरही भारताच्या धान्य निर्यातीत सातत्याने वाढ होत आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या(2021-22) पहिल्या सात महिन्यात (एप्रिल ते ऑक्टोबर), भारताच्या गव्हाची निर्यात आकारमानाच्या दृष्टीकोनातून 527 टक्के म्हणजे 3.2 दशलक्ष टनांवर पोहोचली, गेल्या वर्षी याच काळात ती केवळ 0.51 दशलक्ष टन होती. मूल्याचा विचार करता चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान निर्यातील 546 टक्के वाढ होऊन तिचे मूल्य 872 दशलक्ष डॉलर झाले. गेल्या वर्षी याच कालावधीत 135 दशलक्ष डॉलरची निर्यात झाली होती.

चालू आर्थिक वर्षात(2021-22) भारताच्या गव्हाची निर्यात आतापर्यंतचा नवा उच्चांक प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. गव्हाच्या निर्यातीने 2020-21 मधील 2.09 दशलक्ष टनांचा टप्पा यापूर्वीच ओलांडला आहे.

भारताच्या गव्हाची निर्यात  मुख्यत्वे शेजारी राष्ट्रांना होत असून यामध्ये 2020-21 मध्ये बांगलादेशचा आकारमान आणि मूल्य या दोन्हीच्या दृष्टीकोनातून सर्वाधिक 54 टक्के वाटा आहे. त्याचबरोबर भारताने येमेन, अफगाणिस्तान, कतार आणि इंडोनेशिया या नव्या बाजारपेठांनाही निर्यात सुरु केली आहे.

कृषी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण अपेडाने उचललेल्या विविध पावलांमुळे आणि राबवलेल्या  उपक्रमांमुळे गव्हाच्या निर्यातीत वाढ होत आहे. विविध देशांमध्ये बी टू बी प्रदर्शनांचे आयोजन, नव्या संभाव्य बाजारपेठांची चाचपणी आणि भारतीय दुतावासांच्या सक्रिय सहभागासह पणनविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

सारणीः भारताकडून गव्हाची निर्यात होत असलेले पहिले दहा देश(2020-21)

CountryQuantity (in tones)Value (in US$ million)Share % in volume termsShare % in value terms
Bangladesh1157399.35299.455.454.5
Nepal330707.7483.2315.815.1
UAE187949.46519.09.3
Sri Lanka94039.6324.734.54.5
Yemen Republic8600024.054.14.4
Afghanistan5558419.032.73.5
Qatar63452.8716.753.03.0
Indonesia5605115.292.72.8
Oman30179.338.371.41.5
Malaysia9509.332.540.50.5
Total (top ten countries)20708735449999
Total Exports2,088,488550100100

Source: DGCIS

Related posts

डॉ.भाऊसाहेब मिस्तरी यांच्या रंधा कादंबरीचा अभ्यासक्रमात समावेश

Saloni Art : अशा प्रकारे रंगवा कुंड्या…

मध्य भारतासाठी शिफारस केलेल्या एनआरसी -१३० या वाणाचे कणेरी मठावर बिजोत्पादन

Leave a Comment