📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 29, 2026
काय चाललयं अवतीभवती

कंधार येथे १५ नोव्हेंबरला सातवे छत्रपती शिवाजी महाराज मराठी साहित्य संमेलन

कंधार येथे १५ नोव्हेंबर २०२६ रोजी होणाऱ्या सातव्या छत्रपती शिवाजी महाराज मराठी साहित्य संमेलनाची माहिती दर्शविणारे चित्र

संमेलनाध्यक्षपदी आरती झोटिंग तर स्वागताध्यक्षपदी भास्कर गीते

पुणे – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ७ वे छत्रपती शिवाजी महाराज मराठी साहित्य संमेलन १५ नोव्हेंबर २०२६ रोजी नांदेड जिल्ह्यातील कंधार या ठिकाणी संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिका आरती झोटिंग तर स्वागताध्यक्षपदी साहित्य परिषदेचे जिल्हा अध्यक्ष भास्कर गीते यांची निवड करण्यात आल्याची माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी दिली आहे. उद्घाटन समारंभ, पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, कविसंमेलन असे संमेलनाचे स्वरूप असून मोठ्या संख्येने साहित्यिक व रसिक या संमेलनास उपस्थित राहणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी या साहित्य संमेलनाचे आयोजन दरवर्षी विविध ठिकाणी केले जाते. या अगोदरचे संमेलन रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड या ठिकाणी संपन्न झाले होते.

इतिहासातून प्रेरणा घेणारे संमेलन

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नव्हते, तर ते एक दूरदृष्टी असलेले लोककल्याणकारी शासक होते. रयतेचे राज्य ही त्यांची संकल्पना आजही सामाजिक समतेचा आदर्श मानली जाते. त्यांनी जाती-पातीच्या पलीकडे जाऊन सर्व जाती-धर्माच्या मावळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य उभे केले. अठरापगड जातींना सोबत घेऊन, स्त्री सन्मानाचा आदर्श घालून, शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन त्यांनी सामाजिक न्यायाची मुहूर्तमेढ रोवली. या संमेलनाच्या माध्यमातून हीच विचारधारा नव्या पिढीपर्यंत साहित्याच्या माध्यमातून पोहोचविण्याचा परिषदेचा उद्देश आहे.

कंधारचे ऐतिहासिक महत्त्व

नांदेड जिल्ह्यातील कंधार हे शहर केवळ भौगोलिक दृष्ट्याच नव्हे तर ऐतिहासिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे आहे. कंधारचा भुईकोट किल्ला, राष्ट्रकूट काळातील इतिहास आणि मराठा कालखंडातील वीरता यामुळे या भूमीला एक वेगळे तेज आहे. अशा ऐतिहासिक भूमीत हे संमेलन होणे म्हणजे इतिहासाला साहित्याची जोड देण्यासारखे आहे.

साहित्यातून समाजप्रबोधन

शिवचरित्र हे केवळ युद्धकथांचे वर्णन नाही, तर ते व्यवस्थापन, शेती, जलनीती, परराष्ट्र धोरण आणि लोकशाही मूल्यांचे पाठ्यपुस्तक आहे. आजच्या काळात जेव्हा समाजात इतिहासाचे विकृतीकरण होत आहे, तेव्हा अस्सल शिवइतिहासावर आधारित साहित्य निर्माण होणे काळाची गरज आहे. या संमेलनात ‘शिवाजी महाराजांची सामाजिक दृष्टी आणि आजचे मराठी साहित्य’, ‘ग्रामीण साहित्य आणि शिवचरित्र’ अशा विषयांवर परिसंवाद होणार असून, नवोदित लेखकांना योग्य दिशा मिळणार आहे.

या संमेलनामुळे मराठवाड्यातील साहित्यिक चळवळीला नवी ऊर्जा मिळेल आणि शिवाजी महाराजांचा खरा, समतावादी आणि रयतेचा इतिहास घराघरात पोहोचेल, असा विश्वास डॉ. शरद गोरे यांनी व्यक्त केला.

Related posts

आगळा वेगळा बोटॅनिकल फॅशन शो..

राज्यस्तरीय शब्दांगण साहित्य पुरस्कार २०२४ जाहीर

लोकराजा राजर्षी शाहू यांना आदरांजली

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406