February 22, 2024
A river of words poem by Aba Patil
Home » शब्दांची नदी
कविता

शब्दांची नदी

शब्दांची आठली नदी
संवादाची फुटली नाव
ऐल तिरी पैल तिरी
तुझा माझा उजाड गाव

आता भेटून जाणे असे
वाळूवरची रुक्ष नक्षी
गळ गळ्यात मासळीच्या
कोळ्याचीही एकादशी

पूल पडला एकाकी
काठावरच निसरे पाय
वटकी फांदी .. रिता खोपा
उभ्या झाडाला ओली हाय

जरी नदी आठली तरी
कोरडे पात्र वाचून बघ
तुझा माझा संवाद होतील
सुक्या नदीवर शुभ्र ढग

आबा पाटील
मोबाईल – 90496 61266

Related posts

सडे संवर्धन काळाची गरज

पिंपरी चिंचवड महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर

बाय वन, गेट वन फ्री !

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More