June 22, 2024
Apate Wachan Mandir awards announced
Home » आपटे वाचन मंदिरातर्फे साहित्यकृती पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

आपटे वाचन मंदिरातर्फे साहित्यकृती पुरस्कार जाहीर

डॉ. घनश्याम बोरकर यांच्या कालजयी या काव्यसंग्रहास इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार व अभग बंग यांच्या या जीवनाचे काय करु?… आणि निवडक या साहित्यकृतीस उत्कृष्ट मराठी गद्य साहित्यकृती पुरस्कार जाहीर. या पुरस्कारांचे वितरण शनिवारी ( दि. २२ जून २०२४) ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे यांच्या हस्ते ग्रंथालयाच्या बजाज सभागृहामध्ये सायंकाळी पाच वाजता होणार आहे.

इचलकरंजी – येथील शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी आपटे वाचन मंदिराच्यावतीने देण्यात येणारा इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार २०२३, कांदिवली (मुंबई) येथील कवी डॉ. घनश्याम बोरकर यांच्या कालजयी या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. हा काव्यसंग्रह ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांनी ग्रंथालयास दिलेल्या देणगीमधून भर घालून ग्रंथालयाच्या वतीने वर्षभरात प्रसिद्ध झालेल्या उत्कृष्ट काव्यसंग्रहास इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार देण्यात येतो. सन्मानपत्र व ५००० रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्ट यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट मराठी गद्य साहित्यकृती पुरस्कार २०२३, गडचिरोली येथील डॉ. अभय बंग यांच्या या जीवनाचे काय करु? ..आणि निवडक या गद्य साहित्यकृतीस जाहीर झाला आहे. हे पुस्तक राजहंस प्रकाशनने प्रकाशित केले आहे. १९७४ साली पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टची स्थापना करण्यात आली असून दरवर्षी त्या वर्षातील उत्कृष्ट मराठी गद्य साहित्यकृतीस हा पुरस्कार देण्यात येतो. सन्मानपत्र व ५००० रुपये असे या पुरस्काराते स्वरुप आहे.

अन्य पुरस्कार असे –

ग्रंथालयातर्फे डॉ. श्री. अशोक सौंदत्तीकर यांनी दिलेल्या निधीतून आशाताई सौंदत्तीकर उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार दिला जातो. यावर्षी महादेव माने यांच्या खंडोबाचीवाडी (भिलवडी) यांच्या वसप या कथासंग्रहाला जाहीर झाला आहे. ग्रंथाली प्रकाशनाची हे पुस्तके आहे. सन्मानपत्र व ५००० रुपये असे या पुरस्कार स्वरुप आहे.

ग्रंथालयातर्फे विवेक विनायक देशपांडे यांनी दिलेल्या निधीतून विनायकराव श्रीधर देशपांडे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार पी. विठ्ठल ( नांदेड ) यांच्या संभ्रमाची गोष्ट या कादंबरीला जाहीर झाला आहे. याचे प्रकाशक राजहंस प्रकाशनने केले आहे. सन्मानपत्र व ५००० रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

भारतीय लेखकांच्या अन्य भाषेतील साहित्यकृतीच्या मराठी भाषेतील उत्कृष्ट अनुवादासाठीचा महादेव बाळकृष्ण जाधव अनुवादित साहित्यकृती पुरस्कार दिला जातो. यावर्षी विंग कमांडर अशोक लिमये, अनुवाद सोनाली नवांगुळ, कोल्हापूर यांच्या राखेतून उगवतीकडे या अनुवादित साहित्यकृतीस जाहीर झाला आहे. या पुस्तकाचे प्रकाशक राजहंस प्रकाशनने केले आहे. सन्मानपत्र व ५००० रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. ग्रंथालयाचे माजी अध्यक्ष मा. वि. प. जगदाळे यांनी दिलेल्या निधीतून हा पुरस्कार दिला जातो.

ग्रंथालयातर्फे अॅड. मुकुंद वामन अर्जुनवाडकर, जयसिंगपूर यांनी दिलेल्या निधीतून वसुंधरा मुकुंद अर्जुनवाडकर यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट ललित गद्य साहित्यकृती पुरस्कार दिला जाणार आहे. यावर्षी सुजाता राऊत, पाचपाखाडी (ठाणे) यांच्या मातीत मिसळण्याची गोष्ट या ललित गद्य साहित्यकृतीस जाहीर झाला आहे. या पुस्तकाचे प्रकाशक सृजनसंवाद प्रकाशन, चरई (ठाणे) हे आहेत. सन्मानपत्र व ५००० रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

ग्रंथालयातर्फे पार्वती शंकरराव तेलसिंगे उत्कृष्ट बाल साहित्यकृती पुरस्कारासाठी बाळकृष्ण बाचल, पुणे यांच्या फुलांचे संमेलन या साहित्यकृतीस जाहीर झाला आहे. या पुस्तकाचे प्रकाशक यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे हे आहेत. डॉ. श्रीरंग तेलसिंगे यांनी दिलेल्या निधीतून पुरस्कार दिला जातो. सन्मानपत्र व ३००० रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

ग्रंथालयातर्फे दादासाो जगदाळे यांनी दिलेल्या निधीतून रागिणी दादासो जगदाळे यांच्या स्मरणार्थ युवा पद्मरत्न पुरस्कार दिला जाणार आहे. तो यावर्षी नयन पऱ्हाड, शिरजगाव भिकमराय (अमरावती) यांच्या नकळत या साहित्यकृतीस जाहीर झाला आहे. या पुस्तकाचे प्रकाशक मेधा पब्लिशिंग हाऊस, अमरावती हे आहेत. सन्मानपत्र व ५००० रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

तसेच कै. वसंतराव दातार यांच्या स्मरणार्थ लक्षणीय काव्यसंग्रह म्हणून आवरसावर (बबन सराडकर-अमरावती) या काव्यसंग्रहास जाहीर झाला आहे व कै. सुलभा मगदूम यांच्या स्मरणार्थ लक्षणीय काव्यसंग्रह म्हणून हंबरवाटा (संतोष आळंजकर) – शहापूर (औरंगाबाद) या काव्यसंग्रहास जाहीर झाला आहे. आवरसावर याचे प्रकाशक ज्ञानपथ पब्लिकेशन, अमरावती व हंबरवाटा याचे प्रकाशक शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर हे आहेत. सन्मानपत्र व २००० रुपये असे या लक्षणीय काव्यसंग्रह पुरस्काराचे स्वरुप आहे.

लक्षणीय गदय साहित्यकृतीसाठी निसर्गकल्लोळ (अतुल देऊळगावकर), लातूर व वज्रपुरुष (अरविंद व्यं. गोखले)-पुणे, यांना जाहीर झाला आहे. निसर्गकल्लोळ याचे प्रकाशक राजहंस प्रकाशन प्रा. लि., पुणे व वज्रपुरुष याचे प्रकाशक मौज प्रकाशन गृह, विलेपार्ले हे आहेत. सन्मानपत्र व २००० रुपये असे लक्षणीय साहित्यकृती पुरस्काराचे स्वरुप आहे.

अॅड. स्वानंद मुकुंद कुलकर्णी यांनी दिलेल्या निधीतून कै. मुकुंद विठ्ठल कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ स्थानिक साहित्यिक पुरस्कार दिला जातो. तो यावर्षी प्रा. अशोक दास यांना जाहीर झाला आहे. सन्मानपत्र व ५००० रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तर उत्कृष्ट वाचक पुरस्कार समीर मैंदर्गी यांना जाहीर झाला आहे.

या पुरस्कारांचे वितरण शनिवारी ( दि. २२ जून २०२४) ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे यांच्या हस्ते ग्रंथालयाच्या बजाज सभागृहामध्ये सायंकाळी पाच वाजता होणार आहे.

Related posts

अमरवेल पुस्तकास शब्दांगण पुरस्कार

Neettu Talks : राईस ब्रॅन आईलचे फायदे…

उत्कृष्ट पर्यटन गाव नामांकनासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406