AR Augma series नावाने आम्ही ही एक नवीन पुस्तक मालिका छोट्या वाचकांसाठी आणली आहे. स्पोर्ट्स डे ऍट जंगल नावाची एक धमाल चित्रकथा तुम्हाला प्राण्यांच्या जगात घेऊन जाते. जंगलात स्पोर्ट्स डे म्हणजेच क्रीडा दिवस असेल, तर काय काय गमती जमती होतील, ते सांगणारी एक रंजक, कुतूहलजन्य गोष्ट आहेच; पण त्याबरोबरच अजून एक वैशिष्ट्य आहे बरं !
मोबाईल – 7349783221
प्रज्ञा वझे घारपुरे
AR Augma सिरीजमधे विशेष काय आहे, तर आमची टेकनॉलॉजी ! यात छापील पुस्तकासोबत आम्ही एक ऍप मोफत देत आहोत. हे ऍप तुम्ही तुमच्या फोन किंवा आयपॅडवर डाउनलोड करायचं आणि मग त्याच्या कॅमेरा लेन्समधून पुन्हा पुस्तक पाहायचं ! यातून तुम्हाला ते पुस्तक तुमच्या स्क्रीनवर 3D स्वरूपात म्हणजे वरून, खालून, अधिक जवळून, तसंच त्या वस्तूच्या सर्व बाजूंनी पाहता येते. पुस्तकात वाचलेली गोष्ट, काही वाढीव संवादांमधून, बॅकग्राऊंड आवाजांसहित ऐकता देखिल येईल. मुलांना ऐकायला, सोबत गायला आवडेल असं एक छोटंसं बडबडगीतसुद्धा यात समाविष्ट केलेलं आहे, ज्याने पुस्तकाची मजा पुरेपूर घेता येते.
हे पुस्तक आहे तरी कसे पाहण्यासाठी हा व्हिडिओ जरुर पाहा
आपल्या भारतीय, आणि त्यातूनही मराठी महिलांनी ऑगमेंटेड रिऍलिटी, या टेकनॉलॉजीचा वापर करून बनवलेलं, भारतातलं हे पहिलं इंग्रजी गोष्टीचं पुस्तक आहे. सोनाली देशपांडे, दीपा गोकाककर आणि मनिषा रोडे अशी या महिलांची नावे आहेत. तुम्हाला जर का तुमची प्रत मागवायची असेल तर 7349783221 या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा.