एन एनगेजिंग स्लाईस ऑफ लाईफमधून प्रेरणादायी जीवनाचे चित्रण – डॉ. यशवंत थोरात
जीवनात अनेक प्रसंग आपणाला खूप काही शिकवून जातात. असेच काहीसे प्रसंग लेखिका डॉ. अपर्णा पाटील यांनी एन एनगेजिंग स्लाईस ऑफ लाईफ या पुस्तकात कथेच्या स्वरुपात मांडले आहेत. या विविध प्रेरणा देणाऱ्या बारा गोष्टींचे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे प्रकाशन नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात व आरबीआयच्या माजी गव्हर्नर उषा थोरात यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना श्री. थोरात म्हणाले, चित्रकार रंगाने जसे चित्र रंगवतो तसे लेखक हा शब्दांनी ते चित्र मांडतो. त्यामुळे पुस्तक लिहिणे ही काही सोपी गोष्ट नाही. डॉ. अपर्णा पाटील यांचे हे पुस्तक त्यांच्या व्यक्तीगत जीवनातील पैलू उलघडणारे आहे. यामुळे या सुंदर पुस्तकातून वाचकांना निश्चितच प्रेरणा मिळेल. हे पुस्तक लिहिण्यासाठी डॉ. पाटील यांनी खूप कष्ट घेतले आहेत. हे त्यांचे चौथे पुस्तक आहे. इतक्या लहान वयात त्यांचे चौथे पुस्तक प्रकाशित होत आहे. हे त्यांचे मोठे यश आहे. डॉ. अपर्णा यांनी धाडसाने आणि जिद्दीने केलेला हा प्रवास निश्चितच कौतुकास्पद आहे.
मुंबईच्या इन किंग इनोव्हेशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. पुस्तकाचे प्रकाशन ऑनलाईन झाले. आभार प्रदर्शन दिशा मलहोत्रा यांनी केले. तर सुत्रसंचालन खुशबु तलरेजा यांनी केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.