धुळकुंडा …
कोण आमदार होईल
कोण खासदार होईल
कोणाचं तिकीट कटल
कोणाला पक्ष पटल ..??
गावागावात सध्या जत्रा भरतात
गप्पांच्या फैरी झडतात …
पुरुष सभांना जाताय
नेत्यांची भाषण ऐकताय
रॅलीत घोषणा देत देत
पोरं धुळकुंडा खाताय…
इकडे वर्षानुवर्ष –
वावरात माय राबते
बहीण राबते ..
प्रत्येकाची बायको राबते…
त्यांच्या हाडामासातलं रक्त पिऊन
फुललेलं पीक फक्त ..हमीभाव मागते…!!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.