March 30, 2023
Purchase of Peanut online
Home » हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणीस 31 मार्च पर्यंत मुदतवाढ
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणीस 31 मार्च पर्यंत मुदतवाढ

हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणीस 31 मार्च पर्यंत मुदतवाढ

सांगली : जिल्ह्यात पणन हंगाम 2022-2023 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार नाफेडच्या वतीने हरभरा खरेदी करण्यात येत आहे. हरभरा खरेदी करीता शासन निर्णयातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांची एन.ई.एम.एल पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी 27 फेब्रुवारी 2023 पासुन सुरु झाली असून नोंदणी करीता 31 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली.

सांगली जिल्ह्यात विष्णु आण्णा ख. वि. संघ, सांगली/जत (संपर्क – 7507777849 सुर्यकांत शिंदे) व ॲड आर आर पाटील शेतकरी सह ख. वि. संघ, तासगाव (संपर्क – 9420360570 सुरेश सगरे) या खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे.

हमीभावाने हरभरा खरेदी सुरु करण्यापुर्वी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी चालु हंगामातील पिक पेरा ऑनलाईन नोंद असलेला अद्यावत सात बारा उतारा, बँक खात्याच्या पासबुकची साक्षांकित प्रत, आधारकार्ड प्रत तसेच शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक इ. कागदपत्रासह पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करुन घेणे आहे. चालु हंगामात हरभरा पिकासाठी रक्कम 5 हजार 335 रूपये आधारभुत किंमत जाहिर झाली असून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होण्यासाठी मुदतीत नोंदणी करुन घेण्याचे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.

Related posts

कृषि सल्लाः उन्हाळ्यात पिकांची आणि पशूंची अशी घ्या काळजी..

नदी प्रदुषणाकडे गांभिर्याने पाहण्याची गरज

जाणून घ्या… कडुलिंबाचे औषधी उपयोग

Leave a Comment