November 27, 2021
Home » ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी असे मानले भारताचे आभार
सत्ता संघर्ष

ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी असे मानले भारताचे आभार

सर्व जग कोरोनाच्या संकटाने हैराण झाले आहे. प्रत्येकाला आता स्वतःचे उद्योग, नोकरी सांभाळण्यात अडचणी येत आहेत. काहींही नोकऱ्या गमावल्या आहेत तर काहींना उद्योगात फटके बसले आहेत. अशा या त्रस्त वातावरणात कोरोनावर भारतीय बनावटीची लस निश्चितच हवीहवीशी वाटणारी आहे. जगभरातून भारतीय लसीला आता मागणी वाढली आहे.

भारत नेहमीच अडचणीच्या काळात सहकार्य करणारा देश म्हणून ओळखला जातो. नुकतीच भारताने ब्राझीलला कोरोनाची लस पाठवली आहे. यावर भारताचे आभार माननारे सुंदर चित्र ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर एम बोलसोनारो यांनी शेअर करून भारत देशाचे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

भगवान मारुतीने बेशुद्ध पडलेल्या लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी संजिवनी बुटीचा पर्वतच आणला होता. या इतिहासाची आठवण करून देत कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचावासाठी जाहीर लाॅकडाऊनमुळे थंड पडलेल्या देशाच्या विकासाला पुन्हा चालना देण्यासाठी भारताने पाठवलेली लस ही हनुमानाची संजिवनी बुटीच आहे असे सांगणारे चित्र सादर करत ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी आभार व्यक्त केले आहेत.

Brazil President says thanks to India in this way

Related posts

निवडणुकांसाठीच कृषी कायदे रद्दचा निर्णय ? आपणास काय वाटते…

Atharv Prakashan

शेतकऱ्याचे मारेकरी कोण ?

Atharv Prakashan

कपिल पाटील यांच्या संघर्षाची पंधरा वर्षे

Atharv Prakashan

Leave a Comment