दार उघडलं
सोबती गेले वरती
जीवन निरर्थक झालं
कधी सुने कडे तर
कधी लेकी कडे
घालवलं
परवड झाली सर्वांची
म्हणून,
आश्रमाचं दार उघडलं….
ते होते सोबतीला
सगळं घर पोसलं जायचं
ते गेल्यावर
आता कोणी पोसायचं
आपलं म्हणून राहिलं नाही
घरच परकं झालं
म्हणून,
आश्रमाचं दार उघडलं….
ते होते सोबतीला
मोकळा श्वास घेत होते
सगळेच कुटुंब
आनंदाने रहात होते
पाहुण्यांची रेलचेल
सणावाराचा गोडवा होता
ते गेल्यानंतर
श्वास माझा कोंडत गेला
कोपर्यात जागा बसायला
अडगळीत दिले रहायला
ह्यांनी मोकळे जगावं
म्हणून,
आश्रमाचं दार उघडलं….
संसाराचे ओझे वाहिले
आम्ही ज्यांच्या साठी
त्यांनाच आम्ही ओझे झालो
न पेलण्यासाठी
म्हणून,
आश्रमाचं दार उघडलं….
एक श्वास सोबतीने
स्वच्छंदी रहात होता
तोच शेवटचा श्वास
आश्रमात सोडायचा होता
म्हणून,
आश्रमाचं दार उघडलं…..
कवी : चंद्रशेखर प्रभाकर कासार
चांदवडकर ,धुळे.
७५८८३१८५४३.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.