June 22, 2024
Change current situation of dry land poem by Manisha Patil
Home » कोरड्या मातीचे वर्तमान बदलावे म्हणून…
कविता

कोरड्या मातीचे वर्तमान बदलावे म्हणून…

उपाशी चिमणीचा
खोल आवाज
केळीच्या पानासारखा
चिरत जातो जिवाला
अशावेळी
भयव्याकुळ वाऱ्याची पावलं
शोधू लागतात
मातीच्या हातावरील
कोंभ

काळोखाच्या मिठीतल्या
भयभीत
पायवाटांसाठी
जागत राहतात
चंद्राच्या पापण्या …

ऋतुंच्या फुटव्यासाठी
स्वप्नांचे रुजवे
घालायला हवेत
हा धीर जगवत राहतो
रोपारोपाला…

युगांतराच्या प्रतीक्षेत
टिकून राहतात
पारंब्या
मातीचे बोट धरुन…

दिवसाच्या रिंगणात
कुणी तरी कुठे तरी
घालत राहते पाणी
वांझोट्या नात्यांना…

कोरड्या मातीचे
वर्तमान
बदलावे म्हणून ….

सौ.मनीषा पाटील
देशिंग-हरोली

Related posts

मातोश्री केवळबाई मिरेवाड राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

ग्रामीण जीवनातील साद पडसादांचा लेखाजोखा मांडणारी कादंबरी – राशाटेक

नाती…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406